दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
मलकापूर: दि.४.कर्मचार्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नगरपालिका कर्मचाऱ्यांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेली आहे म्हणून काम बंद आंदोलन प्रसंगी आमदार राजेश एकडे, तहसीलदार तथा नगर परिषद प्रशासक राजेश सुरडकर, मुख्याधिकारी रमेश ढगे, माजी नगराध्यक्ष हरिष रावळ, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश पाटील, तालुकाध्यक्ष गणेश चौधरी यांच्यासह आदींनी भे टी दिल्या. शासन व राज्यातील नगरपालिका प्रशासन संचनालय स्तरावर राज्यातील नगरपालिका नगरपंचायती कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नाबाबत जाणून बुजून दुर्लक्ष होत असल्यामुळे नगरपरिषद संघटनेचे पदाधिकारी सर्व सदस्य कर्मचारी हे अत्यावश्यक सेवे सह बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. यावेळी आमदार राजेश एकडे यांनी बोलताना सांगितले की कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्का च्या मागणी करिता आपण शासन दरबारी हा प्रश्न उचलून धरू व न.प. कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.