दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
लोहा नगर परिषद कार्यालयात समतेचे पुरस्कर्ते जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस लोहा नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार ,माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, गटनेते करीम शेख, नगरसेवक भास्कर पवार, नगरसेवक अमोल व्यवहारे, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड यांच्या सहित सर्व कर्मचारी उपस्थित होते.
सर्वांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांना अभिवादन केले.