दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी- नवनाथ डिगोळे
उद्घाटक कार्यसम्राट लोकप्रिय आमदार मा श्री बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले
चाकूर तालुक्यातील मौजे अजनसोंडा बु.येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध बनकर यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी सुमितभैया वाघ हे उपस्थित राहिले.यावेळी जयंती समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.या जाहीर सभेप्रसंगी राष्ट्रवादीचे युवा नेते सुमितभैया वाघ यांनी आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच देविदास माने तर प्रमुख पाहुणे रिपाइंचे राज्यसचिव बाबासाहेब कांबळे,पंचायत समितीचे माजी उपसभापती सज्जन लोणाळे,माजी सरपंच शिवाजीराव माने,राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम जाधव,ज्येष्ठ नेते गणपत नितळे,माजी पोलीस उपनिरिक्षक विश्वनाथ येडके,आबासाहेब माने सिद्धाजी माने आदीजण उपस्थित होते.