दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
नांदुरा: दि. ४. बुलडाणा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात एक अग्रगण्य कोतवाल कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या व्यवस्थापन समितीकरीता निवडणूक कार्यक्रम दि.२३ एप्रिलला जाहीर झाला आहे. नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दि.२९ एप्रिलला ११ नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले.नामनिर्देशन पत्राची यादी दि.२ मे ला प्रसिद्ध करण्यात आली.त्यामध्ये अकरा जागांसाठी अकराच नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अविरोध होणार हे निश्चित.एक औपचारिकता म्हणून निवडणूक अविरोध झाल्याची घोषणा होणे फक्त बाकी आहे. ज्या अकरा जागांसाठी ही निवडणूक होत आहे त्यामध्ये सर्वसाधारण ६, महिला राखीव २, अनुसूचित जाती व जमाती १ ,विमुक्त जाती/भटक्या जमाती / विशेष मागासवर्ग १ व इतर मागासवर्गीय १ यांचा समावेश आहे.नामनिर्देशन पत्र प्राप्त मध्ये काशिनाथ सीताराम चोपडे, निनाजी पर्वत कुटे, श्रीराम मोतीराम देवकर, राहुल विनायक पाटील, विठ्ठल साहेबराव मिरगे, रमेश प्रल्हाद गावंडे, वंदना संजय चंदनगोळे, मोहिनी महादेव वाघ, विनोद जयराम भीडे, गणेश मोतीराम उबाळे, मोरूबुवा भानुदास उंडे यांचा समावेश आहे. ए.बी.सांगळे तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्था नांदुरा हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पहात आहेत.