दैनिक चालु वार्ता धाड सर्कल प्रतिनिधी-सलमान नसिम अत्तार
कोरोना मुळे गेल्या 2वर्षात ईद एकदम साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत होती.
पण आता कोरोना वर चे सर्व निर्बंध उठवल्या मुळे या वर्षी ईद अति उत्सहाने साजरी करण्यात आली.
ग्रामपंचायत सदस्य पती श्री कलीम अत्तार. चांडोळ जामा मस्जिद ट्रस्ट चे अध्यक्ष नसरुल्ला खान पठाण यांनी सर्वाना ईद उल फित्र च्या शुभेच्छा दिल्या.
ईद संबंधी इतर मान्यता
हिंदू बांधवांची दिवाळी तशीच मुस्लिम बांधवाची रमजान ईद त्यामुळे या दिनी मुस्लिम बांधव नवीन वस्त्र परिधान करून नमाज अदा करतात. आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी ते प्रार्थना करतात. या दिवशी अदा केलेली नमाज सलात-अल-फज्र या नावाने ओळखली जाते. कुराणातील मान्यतांनुसार, पवित्र रमजानमध्ये संपूर्ण महिनाभर रोजे ठेवणाऱ्यांना अल्लाह बक्षीस आणि इनाम देतो. म्हणूनच या दिवसाला ईद म्हणतात, असे सांगितले जाते. संपूर्ण महिना प्रामाणिकपणे रोजा पूर्ण करण्यासाठी शक्ती, ताकद दिल्याबद्दल ईद दिनी अल्लाहचे आभार मानले जातात. भूख, तहान यांची जाणीव माणसांना व्हावी, या उद्देशाने रमजान महिन्यात रोजे ठेवले जातात. रोजा ठेवणे आद्य कर्तव्य मानले जाते.
रमजान ईद ही मिठी ईद म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी मुस्लिम बांधव आपापल्या घरी मिष्टान्न तयार करतात. विशेष म्हणजे रमजान ईद दिनी शीर खुरमा करून खाण्याची पद्धत आहे. रमजान ईद दिनी गळाभेटीला विशेष महत्त्व असते. या दरम्यान मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये जाऊन ईद साजरी करण्याची प्रथा आहे.