दैनिक चालु वार्ता धडगांव प्रतिनिधी-विरेंद्र वसावे
गुगलमालपाडा ( कुंडल ):-
ता.धडगांव शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील हरणखुरी व सोमाणा परिसरातील डोंगराळ भागात अज्ञातस्थळी २५ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला आहे . यामुळे परिसरात खळबळ उडाली असून सदर युवतीची हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. २५ वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला आहे . ललिता मोतीराम पाडवी असे सदर युवतीचे नाव असून ती शिरपूर येथे कंपनीत कामात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे . गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सदर युवतीचा बलात्कार करून खून झाला असल्याचा अंदाज असून डोक्यावर दगडाने ठेचल्याच्या खुणा आहेत . उन्हामुळे शरीर काळवट पडलेल्या अवस्थेत मृतदेह आहे .
आई – वडीलांना केला होता फोन
शिरपुरहून शहादामार्गे धडगांव येत असल्याचा फोन ललीता हिने आई- वडिलांना केला होता . यानंतर मात्र सदर युवतीचा मोबाईल फोन बंद येत होता . दि . ०२/०५/२०२२ पासून बेपत्ता असलेल्या मुलीचा शोध आई- वडील करीत होते . पर्वा संध्याकाळी ६.०० वा . युवतीचा मृतदेह आढळून आला . काल राहत्या गावी अंतिम संस्कार करण्यात आले . घटनास्थळी दाखल अधिक तपास सुरू आहे . घटनास्थळावरून पाचशे मीटर अंतरावर बॅग कागदपत्रे व इतर सामान आढळून आल्याने मृतदेहाचा तपास लागला . धडगाव पोलिसांच्या मदतीने सदर युवतीचा मृतदेह धडगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे . शवविच्छेदनाच्या रिपोर्टनुसार अधिक तपास लागण्याची शक्यता आहे .