दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
शिर्डी इथे ऑल इंडिया ग्रामीण क्रिकेट एसोसिएशन आयोजित सातवीं डे नाईट नॅशनल चैंपियनशिप – 2022 टूर्नामेंट स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजय मिळवला आहे. संघातील फलंदाज निखिल कुशेर याने 102 धावा 65 बॉलमध्ये पटकावल्या यामध्ये 14 चौकार तीन षटकारांचा समावेश होता. स्वप्निल वनारसे (39 रन 15 बॉल तीन चौकार तीन षटकार) व गोलंदाजीमध्ये अमोल चव्हाण यांनी चार षटकांमध्ये पाच गडी बाद करत चांगली कामगिरी बजावली. अक्षय गिरेवाड याने चार षटकांमध्ये दोन गडी बाद केले व सर्व सांघिक खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीने महाराष्ट्र संघाला पश्चिम महाराष्ट्र संघावर विजय मिळवता आला.
महाराष्ट्र संघाने 203 धावांचे लक्ष्य दिलेल्या पश्चिम महाराष्ट्र संघाला 91 धावामध्ये गारद करून महाराष्ट्र संघाने विजय मिळवला ऑल इंडिया ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सचिव लव कुमार जाधव यांनी सर्व खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटीचे अध्यक्ष किशोर भारत ढोबळे सर, तसेच महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चव्हाण सर ,महाराष्ट्र टीम महाराष्ट्र संघाचे कोच मदन बदर , पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजेंद्र तुपे यांनीही विजेत्या संघास शुभेच्छा दिल्या व संघाचे कौतुक केले.
या नंतर महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटीचे अध्यक्ष किशोर भारत ढोबळे यांनी सांगितले की गेले दोन वर्षे कोरोणा मुळे या स्पर्धा झाल्या नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु पुन्हा एकदा नव्या जोमाने ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करणार आहोत असे सांगितले.त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि सर्व भागांतून खेळाडू फोन करून समाधान व्यक्त करत आहेत.