दै. चालू वार्ता
प्रतिनिधी पेठवडज
बाजीराव गायकवाड
पेठवडज :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १३ डिसेंबर २०२० रोजी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या राज्यस्तर प्रज्ञाशोध परीक्षेतून राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा एन. सी. ई. आर. टी. नवी दिल्ली यांच्यामार्फत १३ जून २०२१ रोजी घेण्यात येणार होती. परंतु कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा आता २४ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे ८ ऑक्टोबरपासून संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहेत. असे एनसीईआरटी नवी दिल्ली यांच्या तर्फे सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येत आहे.