दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी ÷ सचिन मुगटकर
——————————————————————————
∆ जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील प्रदेश कार्याध्यक्ष उमकांत तिडके पाटील यांची मागणी
——————————————————————————
शिवरायांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस आमदार राजू नवघरे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खूपसे पाटील कार्याध्यक्ष उमाकांत तिडके पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वसमत चे आमदार पुतळा स्थापनेवेळी मर्यादा सोडून शिवरायांच्या घोड्यावर चढून अवमान कारक कृत्य केले आहे. हा शिवरायांचा अपमान आहे. आम्ही हा अवमान सहन करणार नाही कोणतेही महामानव महापुरुषांचा चुकूनही कोणी हवामान केला तरी आम्ही खपवून घेणार नाही जनशक्ती संघटनाही आक्रमकपणे आपली भूमिका घेईल इतर कोनी असे केले असते तर सपुर्ण राज्यभर उद्रेक झाला असता स्वतः मराठा समजून घेणाऱ्या आमदार नवघरे यांनी नीतिमूल्य पायदळी तुडवीली आहेत ही बाब जनशक्ती संघटना कधी खपून घेणार नाही छत्रपती शिवराय हे आमचा आत्मा आहे तो आमचा स्वाभिमान आहे शिवरायांबद्दल कुणी चुकूनही असे कृत्य करेल त्याला आम्ही माफ करणार नाही आमच्या जनशक्ती संघटनेचे भूमिका आहे ही बाब लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तात्काळ नवघरे आमदारकी रद्द करावी व त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी अतुल खुपसे आणि तिडके पाटील यांनी केली आहे