दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
माळेगाव गोंड (नांदुरा): दि.६. स्वयंपाक घरात सामानाची आवराआवर करीत असतांना शेजारीच राहणाऱ्या ३६वर्षाच्या नराधमाने घरात प्रवेश करुन पीडीत अल्पवयीन मुलीला मीठी मारत तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना ४मे च्या सकाळी ७वाजेदरम्यान तालुक्यातील माळेगाव गोंड येथे घडली.
याबाबत पीडीत अल्पवयीन मुलीच्या आईने नांदुरा पोलीसांत धाव घेत दिलेल्या कैफियत मध्ये नमूद केले आहे की आरोपी संतोष प्रल्हाद चिमकर वय ३६वर्षे हा आमच्या शेजारीच राहतो. मी नेहमीप्रमाणे ४मे च्या सकाळी ७वाजेदरम्यान बकऱ्या सोडण्यासाठी घरामागे गेली असतांना माझी मुलगी ही घरात सामानाची आवराआवर करीत होती. बकऱ्या सोडून घरात येत असतांना त्या दरम्यान आरोपी संतोष चिमकर हा माझ्या घरातून निघताना दिसला त्यावेळी त्याला काय आहे असे विचारले असता मला फोन नंबर पाहिजे होता तेव्हा नंबर मागायचा होता. तर घरात कशाला गेला तेव्हा आरोपी घाबरून त्याचे घरी निघून गेला. तर घरात पीडित मुलगी रडताना दिसली तिला विचारणा केली असता संतोष चिमकर आबा घरात आले व माझ्या ड्रेस मध्ये हात टाकून मला मिठी मारली या प्रकाराने मी गोंधळून जाउन ओरडल्याने त्याने मला सोडून दिले. यावरून पोलीसांनी वरील आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४,३५४(अ),४५२ सहकलम ८/१२(पॉस्को)मुलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून हे घरात घुसून विनयभंग प्रकरण अधिक व सखोल तपासासाठी सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल गाडेकर यांच्याकडे देण्यात आले आहे.