दैनिक चालु वार्ता भिगवन प्रतिनिधि: जुबेर शेख
भिगवन :भिगवण स्टेशन मध्ये वैकुंठवासी हभप सिताराम बुवा थोरात उर्फ बुवासाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम विठ्ठल मंदिर सिताराम नगर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये विविध हरिपाठ प्रवचन कीर्तन अशा धार्मिक व समाजप्रबोधन करणार्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तरी या कार्यक्रमासाठी गावातील अनेक नागरिकांनी सढळ हस्ताने मदत केली याप्रसंगी शुक्रवार दिनांक ०६/०५/२०२२ रोजी काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन केले होते. तरी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.यंदा सप्ताहचे३४ वे वर्ष आहे.मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे हरिनाम सप्ताह मध्ये खंड पडला होता परंतु आता यावर्षी अतिशय उत्साही मध्ये भिगवण स्टेशन चा अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला, व यावर्षी तरुणांनी हरिनाम सप्ताहमधे मोठ्या हिरिरीने भाग घेतला.समाजातील अनेकांनी सढळ हाताने मदत केल्याचे व पुढील काळात नावाजलेले किर्तनकार या हरिनाम सप्ताह मध्ये बोलाऊन कार्यक्रम अजून चांगला करण्याचे उद्दिष्ट असल्याचे विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री.विठ्ठल म्हस्के यांनी सांगितले.या मधे अनुक्रमे…..
शुक्रवार दिनांक 29 4 2022 ह भ प पांडुरंग महाराज सातपुते
शनिवार दिनांक 30 4 2022 ह भ प संतोष महाराज गाडेकर
रविवार दिनांक 1 /5 2022 ह भ प लक्ष्मण महाराज कोकाटे
सोमवार दिनांक 2/ 5 2022 ह भ प शाम सुंदर महाराज ढवळे
मंगळवार 3 /5 2022 ह भ प देवराम बाबा गायकवाड
बुधवार दिनांक 4/5/2022ह भ प सुनिल महाराज झांबरे
गुरुवार दिनांक 5 5 2022 शिवाजी महाराज पाहणे
शुक्रवार दिनांक 6/5/ 2022 प्रकाश महाराज जंजिरे, (काल्याचे किर्तन)
काल्याचे किर्तन प्रसंगी कर्मयोगीचे संचालक पराग जाधव, भिगवण पोलीस स्टेशनचे API दिलीप पवार ,भिगवनचे सरपंच तानाजी वायसे, ग्रामपंचायत सदस्य व गावातील, परिसरातील ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.