दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राज्यात विविध घडामोडी घडत असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अचानक मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्य न्यायामूर्ती दिपंकर दत्ता आणि इतर न्यायमूर्तींच्या भेटीसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले. या भेटीमुळे अनेक चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे आणि मुख्य न्यायाधीशांच्या भेटीमागील नेमकं खरं कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण तरीही ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय.
विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंनी गेल्या वर्षीही मुख्य न्यायाधीशांची भेट घेतली होती. राज्य सरकार आणि कोर्ट यांच्यात समन्वय राहावा यासाठी काही काळाच्या अंतरात मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश यांच्यात भेटी होत असतात. मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीश यांच्यात कोर्टातील कर्मचारी आणि इतर समस्यांवर चर्चा होऊ शकतात. याशिवाय काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा होऊ शकते, अशी चर्चा आहे.