दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
मुंबई – झोमॅटो या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिपिंदर गोयल यांनी झोमॅटो फ्युचर फाउंडेशनसाठी 700 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. दिपिंदर गोयल यांना झोमॅटो कंपनीच्या संचालक मंडळाने या अगोदर केलेल्या कामगिरीमुळे काही शेअर दिले होते.
सर्व शेअर दिपिंदर गोयल यांनी झोमॅटो फ्यूचर फाउंडेशनला दान केले आहेत. कंपनीच्या शेअरच्या सध्याच्या भावानुसार या शेअरची रक्कम 700 कोटी रुपये होते.
देशभरात झोमॅटो अन्नपुरवठादाराच्या मदतीने अन्नाचा पुरवठा करीत असते. धकाधकीच्या कामामुळे कर्मचारी हे काम सोडून देतात. कर्मचाऱ्यांनी काम सोडून न देता कंपनीबरोबर काम करावे असा यामागे उद्देश असल्याचे बोलले जाते.
दिपिंदर गोयल यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या अंतर्गत पत्रामध्ये म्हटले आहे की त्यांना मिळालेले सर्व शेअर फाऊंडेशनला देणार आहेत. प्राप्त माहितीनुसार ज्या कर्मचाऱ्यांची पाच वर्षापेक्षा जास्त सेवा झाली आहे अशा कर्मचाऱ्यांच्या दोन मुलांना वर्षाला प्रत्येकी 50 हजार रुपयाची मदत करण्यात येणार आहे.
ज्या कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षापेक्षा जास्त झाला आहे, त्यांच्या प्रत्येक मुलाला एक लाख रुपयापर्यंतची शैक्षणिक मदत वर्षाला केली जाणार आहे. हा सेवेचा कालावधी महिला कर्मचाऱ्यांसाठी कमी करण्यात येणार असून ज्या मुली शिक्षण पूर्ण करतील त्यांना काही प्रमाणात बक्षिस रक्कम देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांची सेवा दहा वर्षापेक्षा जास्त झाला आहे, त्यांच्या प्रत्येक मुलाला एक लाख रुपयापर्यंतची शैक्षणिक मदत वर्षाला केली जाणार आहे. हा सेवेचा कालावधी महिला कर्मचाऱ्यांसाठी कमी करण्यात येणार असून ज्या मुली शिक्षण पूर्ण करतील त्यांना काही प्रमाणात बक्षिस रक्कम देण्यात येणार आहे.
त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांची मुले उच्च शिक्षण पूर्ण करतील त्यांनाही मदत करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्याला प्रवासामुळे दुखापत झाल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी हे फाउंडेशन प्रयत्न करीत असते. सध्याची ही योजना फक्त सुरुवात आहे. आगामी काळामध्ये कर्मचाऱ्यांसाठी आणखी अनेक योजना सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.