दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नांदेड -ग्लोबल अविष्कार फाऊंडेशन नांदेड च्या वतीने सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक क्रिडा क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणा-या गुणवंत व यशवंत अशा व्यक्तीना दरवर्षी सन्मानित केले जाते.
या वर्षीच्या निवेदनाच्या क्षेत्रात अतिशय उत्तम व लक्षणीय कामगिरी केलेल्या महाराष्ट्र विद्यालय , हालसी (तु) येथील सहशिक्षक श्री.प्रवीण गिरी यांची राज्यस्तरीय उत्कृष्ट सूत्रसंचालक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांनी आजपर्यंत च्या निवेदन क्षेत्रातील केलेल्या कार्याचे व योगदानाचे मुल्यमापन करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदर पुरस्कार सोहळा कुसुम सभागृह नांदेड येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.आ.व पालकमंत्री, उच्च तंत्रशिक्षणमंत्री व मा.आ.डी. पी. सावंत हे होते. या कार्यक्रमांत विशेष निमंत्रित म्हणून नांदेडच्या महापौर मा सौ जयश्रीताई पावडे स्वा.ती.म. विद्यापीठाचे कुलगुरू मा.उध्दवरावजी भोसले, नांदेड परिक्षेत्रातील विशेष पोलिस महानिरीक्षक मा. निसार तांबोळी हे उपस्थित होते तर प्रमुख पाहूणे पुणे येथील यशदा संस्थेचे माध्यम व प्रकाशन विभागाचे विभाग प्रमुख मा.बबनरावजी जोगदंड सनदी अधिकारी सिने अभिनेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा. एकनाथ ऊर्फ अनिल मोरे, महाराष्ट्र राज्याचे प्रा. शिक्षण संचालक मा.डॉ.गोंविद नांदेडे, परभणी जि.प.चे पुर्वअति.कार्यकारी अधिकारी मा.शिवाजीराव कपाळे, नांदेड वि.मा.जि.प.चे शिक्षणाधिकारी मा प्रशांतजी दिग्रसकर, प्रा.जि.प. नांदेड चे शिक्षणाधिकारी मा.डॉ.सौ. सविता बिरमे/सिंदगौडा व भारत सरकारच्या भारतीय संस्कृती व संवर्धन समितीचे प्रवक्ता मा.डॉ. साध्वी जेठवानी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या यशस्वी कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन श्री प्रलोभ कुलकर्णी, श्री बालाजी तोरणेकर , जनक गादगे, रूपाली आडगावकर, श्री दयानंद कोजीवाले श्री प्रमोद फुलारी व सौ. रूपाली तोरणेकर यांनी केले. या कार्यक्रमात अतिशय प्रेरक व प्रबोधनकारी विचार मांडले गेले तसेच सत्कारार्थीची मनोगते व्यक्त झाली व या भव्य व सुंदर सोहळयाचे प्रास्ताविक श्री.प्रलोभ कुलकर्णी यांनी तर बहारदार सूत्रसंचालन श्री.प्रवीण अनंत गिरी यांनी केले.