दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी-गोविंद पवार
येथील शासकीय विश्रामगृहात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सव निमित्ताने घेण्यात आलेल्या बैठकीत अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती गठीत करण्यात येवून उत्सव समितीच्या अध्यक्षपदी धीरज हाके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
आयोजित बैठकीच्या अध्यक्षस्थानी भागवत कोरे होते. प्रारंभी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यकारिणी निवड बैठकीस सुरुवात करण्यात आली. कोरोना संसर्गामुळे तब्बल दोन वर्षांच्या खंडा नंतर अहिल्यादेवी जयंती उत्सव साजरा होत असल्याने जयंती उत्सव वैविध्यपूर्ण पद्धतीने व उपक्रमाने हर्षउल्हासात साजरा करण्याची भूमिका मांडली अनेकांनी त्यास समर्थन दर्शविले. यावेळी सर्वानुमते अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती गठित करण्यात आली त्यामध्ये अध्यक्षपदी धीरज हाके, उपाध्यक्ष मारोती जंगले व गजानन गुंठे (कराडे), सचिव व्यंकटेश (पप्पू) नाईक, कोषाध्यक्ष परशुराम वडजे, सहसचिव नवनाथ पोले, दशरथ मनाडे, गोविंद कमळे, केशव खांडेकर,
प्रसिद्धीप्रमुख पाराजी धुळगुंडे, प्रसाद पोले, नितीन सापनर, रॅली प्रमुख पोलेवाडीचे सरपंच पिराजी धुळगंडे, माळेगांवचे सरपंच हनुमंत धुळगंडे, सरपंच मोहन पोले आदींची निवड करण्यात आली.
यावेळी भारत कोपनर किशन गुंठे, दशरथ गुंठे वैभव हाके, बालाजी कराडे, मुन्ना नाईक, संदीप बाजगीर, माधव डोईफोडे, माधव देवकते, आशीष धुळगंडे, मुंजेश आव्हाड, आप्पाराव राजाळे, परमेश्वर पोले, कमलाकर बाजगीर, सुनिल बाजगीर, किरण डोईफोडे आदींसह बहुसंख्य जणांची उपस्थिती होती.