दैनिक चालू वार्ता भुम तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील गणेगाव येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील पंढरीनाथ खरात यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.पहाटे रस्त्यावरून जात असताना एका अज्ञात वाहनाने भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने रस्त्यावर पंढरीनाथ खरात हे जोरात पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.या घटनेची माहिती मिळताच जि.प. सदस्य प्रवीण खटाळ, राष्ट्रवादी युवक नेते उदयसिंह (सोनू राजे) जाधव यांनी घटनास्थळी तातडीने जाऊन अपघात ग्रस्त इसमला घेउन तत्काळ वालवड येथिल ग्रामीण रूग्णालय दखल केलं असता.उपचारदरम्यान प्राणज्योत मालवली. त्यांच्यावरच अंत्यसंस्कार गणेगाव येथे करण्यात आले.कुटुंबावर शोककळा पसरल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंब आर्थिक संकटात सापडल्याने त्याची पत्नी केशरबाई पंढरीनाथ खरात यांना माजी आमदार राहुल भैया मोटे मदतीचा हात पुढे करत रोख रक्कम ५००००/_ रुपये कुटुंबाला मदत देण्यात आली. यावेळी जि.प.सदस्य प्रवीण खटाळ,ग्रा.पं उदयसिंह (सोनू राजे) जाधव, कृष्णा मोरे, समाधान कुंभार, बापू खारत, आबा खैरे,भोरे साहेब, विलास पाटील,प्रशांत जाधव, तानाजी पाटूळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी,असंख्य गावकरी उपस्थित होते.