दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी- बाळासाहेब सुतार
भारतीय जनता पार्टी व तिसरी आघाडी एकत्र होऊन राष्ट्रवादीची सत्ता हटवली.
पिंपरी बुद्रुक येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे मतदान सकाळी 8:०० वाजल्या पासून ते सायंकाळी 5 वाजे पर्यंत शेतकरी मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सायंकाळपर्यंत 85%( पंच्याऐंशी टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे मतदारांनी सकाळ पासूनच आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी हजेरी लावली.
सदर पिंपरी बुद्रुक येथील विकास सेवा सहकारी सोसायटीला शेतकरी वर्ग सभासद, पिंपरी बुद्रुक ,गिरवी ,नरसिंहपूर , टणु, गोंदी, ओझरे, लुमेवाडी, आशा एकूण सात गावातील 1150 सभासदांचा समावेश आहे. त्यापैकी 856 सभासद मतदानास पात्र आसुन मतदार आपला मतदानाचा हक्क बजविला आहे.
सदर निवडणुकी मध्ये पिरसाहेब पंचक्रोशी शेतकरी विकास पॅनल,व लोकनेते कैलासवासी महादेवराव बोडकेदादा पंचक्रोशी ग्राम विकास पॅनल आसे या निवडणुकी मध्ये दोन पॅनल आसुन एकूण 26 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यापैकी भाजपचे 13 उमेदवार विजय होऊन भारतीय जनता पार्टीने यश संपादन करून विकास सेवा सोसायटीची सत्ता संचालक संजय बोडके यांनी एक हाती घेतली. या निवडणुकी मध्ये आटी तटीची लढत झाली. सत्ताधारी पक्ष हा विजयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल आशी आपेक्षा होती परंतु वरिष्ठ पातळीवरच्या नेत्यांचा सहभाग व कारखान दारीच्या जाळ्यात आडकलेले ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार यांना निवडणुकी मध्ये अडचणीत आणल्यामुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागल.व झालेला पराभव आम्ही मान्य केला.
आशी प्रतिक्रिया पॅनल प्रमुख माजी सरपंच श्रीकांत बोडके यांनी या वेळी प्रतिक्रिया दिली.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शना खाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून माजी आदर्श सरपंच श्रीकांत बोडके यांच्या पॅनलचा आसा धुव्वा उडवून त्यांचे प्रतिस्पर्धी माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शेना खाली संचालक संजय बोडके यांनी यश संपादन करून आपली सत्ता स्थापन केली.विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीचा निकाल सायंकाळी ठीक 5 वाजून 45 मिनिटांनी हाती आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तेरा शून्य आसा निकाल जाहीर केला. व भाजपच्या कार्यकर्त्यांन मध्ये मोठ्या प्रमाणात आनंद उत्साह निर्माण झाला व तात्काळ भाजप पक्षाची उमेदवारास सहित मिरवणूक निघाली. सर्व विजयी उमेदवारांचे भाजपचे युवा नेते आमरभैया जगदाळे यांनी विजयी उमेदवारांचे आभार व्यक्त करून शाबासकीच पाठीवर थाप मारली व हार फेटा बांधून सत्कार केला. निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ मी स्वतः आपल्या बरोबर करीत आसताना पिरसाहेब बाबा यांना प्रचाराला फोडलेला नारळ उभा फुटल्यामुळे आपला पिरसाहेब पंचक्रोशी शेतकरी विकास पॅनलचा विजय होणार यामध्ये काही शंका नव्हती आसे वक्तव्य युवा नेते आमरभैया जगदाळे यांनी मीडियाशी बोलताना प्रतिक्रिया दिली. प्रदीप बोडके यांनी पक्षाचा विजय झाल्यानंतर बोलत आसताना म्हणाले की ही आहंकारा विरोधची लढाई आम्ही जिंकली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शना खाली 69 वर्षांची सत्ता मोडीत निघाली आसेही त्यांनी प्रतिपादन केले. विजयाच्या आनंदामध्ये निलश बोडके बोलत असताना म्हणाले की आमचे आधार स्तंभ कैलासवासी पांडुरंग नाना, व कैलासवासी तुळशीराम तात्या, माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब, जिल्हा बँक संचालक आप्पासाहेब जगदाळे, प्रदीपमामा जगदाळे, अमरभय्या जगदाळे, या सर्वांचा आशीर्वाद व मार्गदर्शन आम्हा सर्वांचा पाठीशी आसल्यामुळे आम्हाला यश मिळाले. याचा मला आनंद आहे. भाजपचे विजयी उमेदवार नीरा भीमा साखर कारखान्याचे संचालक संजय तुळशीराम बोडके, नीलेश मच्छिंद्र बोडके, युवराज विलास बोडके, दत्तात्रय ज्ञानदेव बोडके, तुषार सुभाष बोडके, आप्पा भागवत भंडलकर, राजेंद्र विष्णू मगर, भारत उत्तम गायकवाड, मंगल लालासो बोडके, रेश्मा दीपक बोडके, सचिन विठ्ठल सुतार, दत्तात्रेय बाबा नरूटे, युवराज तानाजी गायकवाड, आशा सर्व भाजपच्या उमेदवारांनी विजय घेऊन सत्ता काबीज केली. या निवडणुकी मध्ये सर्वच आजूबाजूच्या गावांनी चांगल्या प्रतीची साथ दिल्यामुळे आलेल्या सर्वांचे आभार सुरेश बोडके यांनी मानले.