दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
अंबाजोगाई- अंबाजोगाई येथील रविवार पेठ परिसरातील मुस्लिम गवळी समाजाच्या कबरस्थान सुशोभीकरणच्या विविध कामाचा शुभारंभ प्र नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना अफसर, तर प्रमुख अतिथी म्हणून हाजी इस्माईल गवळी, मनोज लखेरा, महादेव आदमाणे, सुनील व्यवाहरे, सुनील वाघाळकर, वाजेद खतीब, विजय रापतवार, गणेश मसने, शे वाजेद, अँड इस्माईल चौधरी उपस्थित होते. अंबाजोगाई शहरातील गवळी समाजाच्या कबरस्थानच्या विविध सुशोभीकरण कामाचा उद्घाटन समारंभ शहराचे विकासाभिमुख नेतृत्व राजकिशोर मोदी यांच्या हस्ते गवळीपुरा मित्र मंडळच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. मागील पंधरा वर्षात राजकिशोर मोदी यांनी नगरसेवक सेवक इस्माईल गवळी व गवळीपुरा मित्र मंडळाच्या मागणीनुसार आजपर्यंतसमाजाच्या कबरस्थानच्या विविध कामासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे कार्यक्रमाचे संयोजक जावेद गवळी यांनी प्रस्ताविक करताना दिली. यावेळी आपन कबरस्थानच्या विकास कामासाठी अनेकवेळा राजकिशोर मोदी यांच्याकडून निधी उपलब्ध करून काम करून घेतल्याचे नगरसेवक हाजी इस्माईल गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले. कबरस्थान सुशोभीकरण कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करतांना राजकिशोर मोदी म्हणाले की, आपण नगरपरिषदेच्या माध्यमातून मागील पंचेविस वर्षांपासून शहरात भरपूर विकासाची कामे केली असून यातील नव्वद टक्के कामे फक्त आणि नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहेत. इतरांच्या निधीत शहरात फक्त दहा टक्के कामे झाली असल्याची कोपरखळी लगावली. तसेच आजच्या परिस्थितीमध्ये आणि आणखीन होणाऱ्या विकास कामामुळे गवळी समाजाचे कबरस्थान शहरात क्रमांक एकचे कबरस्थान होईल असा आशावाद व्यक्त केला. समाजाच्या बशुतांश लोकांचा देखील या कब्ररस्थानच्या आजपर्यंतच्या सुशोभिकारण कामास मोलाचा वाटा असल्याचे राजकिशोर मोदी यानी सांगितले. वेळोवेळी समाजातील लोकानी एकत्र येऊन सुंदर असा हा परिसर केला असून याचे कौतुक देखिल मोदींनी केले. आपण राजकारण राजकारणाच्या वेळी तर समाज कारण करून कोणताही समाज कसा पुढे जाईल हे नियमित करतो यापुढे देखील कबरस्थानच्या विकासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे राजकिशोर मोदी यांनी आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक महादेव आदमाणे, अँड इस्माईल गवळी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुसाभाई पपुवाले, बाबा गवळी, जम्मू भाई, हाजी मोला, भाई जुमा चौधरी, कैलास कांबळे, रहीम गवळी, अहेमद पपुवाले हाजी जावेद कटालु चौधरी, रमजान नवरंगाबादे, म्हेबूब गवळी यांच्या समवेत अनेक जण उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमजदभाई गवळी महेबूब भाई गवळी रमजान परसुवाले फेरोज रेघिवाले जुमा गवळी हुसेन गवळी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जावेद गवळी यांनी सूत्रसंचालन विजय रापतवार तर आभार प्रदर्शन म्हेबूब गवळी यांनी केले.