दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
बीड: ऑक्टोबर रोजी तीन दिवसांची आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डच्या ५७ एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात अटक केलेल्या बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉ. एन. आर. शेळकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. चिंचपूर वे प्रकरणानंतर आता रुईनालकोल 1 प्रकरणातही त्याला आरोपी करण्यात आले आहे. त्याला १५ पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथील वक्फ बोर्डच्या मालकीच्या ५७ एकर तर रुईनालकोल येथील संत शेख महंमद बाबा दर्ग्याच्या १०० एकर जमिनीचा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला होता. बनावट कागदपत्राआधारे परस्पर खासगी लोकांना विक्री केल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. चिंचपूर प्रकरणात जुलै २०२१ मध्ये दोघांवर गुन्हा नोंद झाला होता. तपासात बडतर्फ उपजिल्हाधिकारी डॉ. एन. आर. शेळके व सध्या वाशिम ये थे कार्यरत उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव यांच्या स्वाक्षरीने हा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनाही आरोपी केले होते