दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
आमदार संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून शहरातील नगर रोडवरील खड्डे बुजवण्याचे कार्य आज शनिवारी सायंकाळी सुरू करण्यात आले आहे
बीड शहरातील नगर रोड चा रस्ता अत्यंत चर्चेत आला असून खूप चर्चा झालेली या रस्त्याची आ. संदिप भैय्यांच्या प्रयत्नातून नगर रोडवरील खड्डे बुजवण्याच्या कामाची आज सुरुवात करण्यात आली. काम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी पावसाळा उघडताच काम सुरू करण्याचे नियोजन होते. नागरिकांची होणारी गैरसोय पाहता येत्या आठ दिवसात
हे काम दर्जेदाररित्या पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर लवकरच सदरील नगर रोड हा रस्त्याचे काम हे नॅशनल हायवे 361 F अंतर्गत केले जाणार आहे. असे ते म्हणाले यावेळी यावेळी अशोक रोमण, झुंजार घांडे, आमेर आण्णा, शेख मोहसीन, पंकज बाहेगव्हाणकर, पिंटू पवार, अमोल पारवे, दादा हातागले, गणेश जाधव, राजू महुवाले यांच्यासह इ सहकाऱ्यांची उपस्थिती होती..