दैनिक चालु वार्ता पालघर जिल्हा प्रतिनिधी-प्रा.मिलिंद खरात.
पुणे.
महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ पदाधिकारी व राज्याचे शिक्षण संचालक श्री महेश पालकर यांचेसोबत पुणे येथे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पुढाकाराने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली. यावेळी आ. डॉ सुधीर तांबे, महासंघ अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर, कोषाध्यक्ष डॉ. अशोक गव्हाणकर, माजी अध्यक्ष प्रा. भास्करराव ज॒रहाड, प्रा. लिपाने, उपस्थित होते यावेळी खालील मुद्द्यावर सर्विस्तर चर्चा करण्यात आली.
१. वाढीव पदाबाबत बोलताना संचालक कार्यालयाने आतापर्यंत १२९३ पैकी केवळ २६५ पदांची माहिती पाठविणे बाकी असून दोन दिवसात या सर्व पदांची माहिती मंत्रालयात पाठविण्यात येईल.
२) आय टी विषय शिक्षकांची माहिती या आधीच मंत्रालयात पाठविण्यात आली आहे असे प्रतिपादन केले.
३) १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या बाबत बोलताना हा शासन स्तरावरील धोरणात्मक निर्णय असून या बाबतची सर्व माहिती शासनास प्राप्त झालेली असून आपण सर्व शिक्षक व पदवीधर आमदार यांचे सोबत एकत्रित पाठपुरावा करत असल्याचे डॉ तांबे यांनी सांगितले.
४) सेवानिवृत्त झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची संपकालीन ४२ दिवसाची रजा त्यांचे खात्यावर जमा करण्यात येईल.
५) विषय गट योजना पूर्ववत ठेवावी याबाबत बोलताना संचालक साहेबांनी आवश्यक ते बदल करण्यात येतील असे सांगितले
.
६) कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी बोलतांना संचालक साहेबांनी सांगितले की सरकार या बाबत सकारात्मक असून या संदर्भातील सर्व तांत्रिक माहिती मंत्रालयात पाठविली आहे.
७) संच मान्यता २०१८_१९ प्रमाणे या वर्षी देखील शिक्षक संख्या निश्चित करावी याबाबत शासनास प्रस्ताव पाठविला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले
.
८) माध्यमिक संलग्न कनिष्ठ महाविद्यालयीन तुकडीतील विद्यार्थी संख्या ६० व वरिष्ठ महाविद्यालयांशी संलग्न मध्ये ८० असावी. या बाबत शासनास प्रस्ताव पाठवावा असे सांगितले
.
९) शिक्षकाचा कार्यभार शून्य झाल्याशिवाय त्यांना अतिरिक्त घोषित करू नये यावर शासन स्तरावर पाठपुरावा करावा असे सांगितले
.
१०) रिक्त पदे भरण्यात यावी या मागणी संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की लवकरच पोर्टल मार्फत ही पदे भरण्यात येणार आहेत. त्या संदर्भात लवकरच अभियोग्यता परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे असे प्रतिपादन केले
.
११) नव नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना महिन्याच्या आत शिक्षक मान्यता व त्यानंतर ८ दिवसात शालार्थ आय डी मिळावा या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले जातील असे सांगितले
.
१२) अनुदानित संस्थेत शिक्षकांना प्रथम नियुक्ती मान्यता देतानाच ३ वर्ष परिविक्षाधीन कालावधीसाठी व त्या नंतर नियमित वेतन श्रेणीतील मान्यता एकाच वेळी देण्यात यावी याबाबत त्यांनी सांगितले की लवकरच सर्व विभागातील उपसंचालकांची बैठक घेऊन या संबंधी उचित सूचना व आदेश देण्यात येतील
.
१३) राज्यातील सर्व जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन राष्ट्रियकृत बँकेमार्फत अदा करण्यात यावे याबाबत देखील शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत सूचना व आदेश देण्यात येतील असे सांगितले
.
१४) सेवाहमी कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे व्हावी याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे व ती प्रभावीपणे राबविण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले
.
१५) शिक्षकांना त्यांच्या वेतनातून कपात केलेल्या पी एफ, सी. पी. पी . व एस.एन पी एस .डी. सी.पी.यस.इ. पावत्या नियमितपणे देण्यात याव्यात. यावर संबधिताना योग्य ते आदेश देण्यात येतील असे सांगितले
.
१६) शिक्षकांची थकीत देयके मंजूर करून ती शिक्षकांना त्वरित अदा करण्यात यावी. यावर थकीत देयकाना मंजुरी देण्यात येईल व ऑनलाईन पद्धतीने शासनाची परवानगी घेऊन अदा केली जातील असे आश्वासन त्यांनी दिले
.
१७) अर्धवेळ शिक्षकांना शिक्षण सेवक पूर्ण झाल्यावर पूर्णवेळ पद पायाभूत मध्ये जाते अशावेळी त्यांचे* *अर्धवेळ चे वेतन पद मंजुरी पर्यंत खंडित करू नये या मागणीबाबत देखील सकारात्मक प्रस्ताव शासनास पाठविला जाईल असे सांगितले
.
१८) मुंबई विभागातील २०१२-१३ मधील नियुक्त शिक्षकांना २०१३-१४ ऐवजी नियुक्ती दिनांकापासून मान्यता देण्याबाबत अनुकूलता दर्शवत त्याबाबत मंत्रालयात चर्चा केली जाईल असे सांगितले.
अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयिन शिक्षक संघटना चे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष प्रा.सुनील पूर्णपात्रे * ( *महासंघ* )
*यांनी दिली.*