दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
केज तालुक्यात एका काळी अवैध धंदे चालकांनी चिरी मीरी करून आप आपले अवैध धंदे मोठ्या जोरात थाटले होते. नव्यने रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी पंकज कुमावत यांनी चार्ज घेताच अवैध धंदे चालकांना डेड लाईन दिली होती अवैध धंदे बंद करा नस्ता कारवाईला समोर जा असे फर्मान काडले होते. केज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हद्दित केज, नेकनूर, धारूर, युसुफवडगाँव पोलीसठाणे येतात गेल्या काही काळ याउपविभागीय पोलीस अधिकारीकार्यालयाला सक्षम अधिकारी मिळत नव्हते या संधीचा लाभा काही अवैध धंदे चालकांनी मोठ्या चवीने संधीचा सोनं करून घेतलं होत.