दैनिक चालू वार्ता
भूम प्रतिनिधी नवनाथ यादव
भूम :शहरातील पार्डी रोड ते बी.अँड.सी वसाहत या दरम्यानच्या डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ भूम न.प.चे.गटनेते तथा माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या हस्ते रविवार दि १७ रोजी करण्यात आला.या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी गटनेते संजय गाढवे यांच्या प्रयत्नातून उपलब्ध केला असून,या भागातच गॅस एजन्सी,बँक ऑफ इंडिया,विमा कार्यालय,इतर काही महत्त्वाचे कार्यालय असून मात्र रस्त्याची दुरावस्था झाली होती.या भागातील रहिवाश्यांची सततची मागणी लक्षात घेऊन हे काम हाती घेतले असून लवकरच ते पूर्णत्वास नेले जाणार आहे.असे गटनेते संजय गाढवे यांनी सांगीतले.यावेळी न.प भुम चे नगरसेवक सागर टकले,संदीप मोटे,प्रताप भोईटे,रामलिंग शिंदे,ए.के गायकवाड,शहाजी पगारे,प्रा राजाभाऊ बनसोडे,रमेश लगाडे,ग्रामसेवक मेघराज गायकवाड,प्रवीण वाघमारे,बाळासाहेब गवळी,धनंजय पवार,राकेश जाधव,मुशीर शेख,भालचंद्र बनसोडे,सचिन गायकवाड,भुजंग इटकर,धनंजय सानप,नगर अभियंता गणेश जगदाळे,रामभाऊ बागडे,गणेश बसवेकर,सागर पगारे,अजित वडेकर,सोमनाथ कडवकर,शाहरुख शेख,शुभम शिलवंत यांच्यासह कुसुमनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विकास कामांचे नागरिकांनी सर्वत्र कौतुक केले.