दैनिक चालू वार्ता
पंढरपूर प्रतिनिधी
सुधीर आंद
सहकार,पणन मंत्री आदरणीय श्री.बाळासाहेबजी पाटील यांच्या शुभहस्ते धाराशिव साखर कारखाना (युनिट क्र.४) सांगोला येथील गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी उस्मानाबाद लोकसभेचे खासदार श्री.ओमप्रकाशजी राजेनिंबाळकर, सांगोला आमदार श्री.शहाजी बापू पाटील, उस्मानाबाद कळंबचे आमदार श्री.कैलास दादा पाटील, मा.आमदार श्री.दिपक आबा साळुंखे-पाटील, शेकाप नेते श्री.चंद्रकांत देशमुख, शिखर बॅक मा.सदस्य श्री.अविनाशजी महागावकर, मनसे नेते श्री.दिलीप बापू धोत्रे यासह आदी मान्यवर उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या सांगोला सहकारी कारखाना सुरू झाला. कारखाना सुरु करुन पंढरपूर-मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संजीवनी मिळणार असून यावेळी सांगोला व पंढरपूर- मंगळवेढा तालुक्यातील व पंचक्रोशीतील अनेक ऊस उत्पादक शेतकरी, कार्यकर्ते, जेष्ठ मंडळी मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.