दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
नवी दिल्ली : जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय QUAD शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जपानमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी टोकियो येथे क्वाड समिटमध्ये सहभागी झाले.
जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांचाही या शिखर परिषदेत समावेश आहे. सध्या पीएम मोदी आणि जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय बैठक सुरू आहे. यानंतर ते जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांची स्वतंत्रपणे भेट घेतील.
या बैठकीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही आपले मत मांडले. “भारत-अमेरिका मिळून खूप काही करू शकतात. आम्ही दोघे मिळून अमेरिका आणि भारतासाठी खूप काही करू शकतो आणि भविष्यातही देशाच्या विकासासाठी काम करत राहू, यूएस-भारत भागीदारी पृथ्वीवरील सर्वात गहन बनवण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या द्विपक्षीय बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले.
बैठकीपूर्वी बायडेन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले. मोदींनी कोरोना काळातील परिस्थिती उत्तमरित्या हाताळली. तर चीन महामारीचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचे त्यांना सांगितले, जे चिन करू शकले नाही ते भारताने करून दाखवले, असे म्हणत बायडेन यांनी मोदींचे कौतूक केले.