दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोह्यातील भुमिपुञ जालना येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र मध्ये असिस्टंट मॅनेजरपदावर रुजु
________________________________________
अथक परिश्रम जिद्द,कुटुंबाची प्रेरणा व आशीर्वाद असेल तर नक्कीच यशोशिखर गाठता येत असल्याचे मत अमोल चव्हाण यांनी व्यक्त केले.लोहा येथील उच्चशिक्षित युवक,युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल बालाजी चव्हाण ज्यांना “एबीसी” या टोपण नावाने ओळखले जाते.यांची नुकतीच जालना येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे वर्ग-१ अधिकारी म्हणून रूजू झाल्यानंतर त्यांनी आपली प्रथमतःच प्रतिक्रिया दिली.
घरात लहानपणापासून शैक्षणिक वातावरण तत्पूर्वी चव्हाण घराणे हे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले घराणे म्हणून ओळखले जाते.आजोबा कै.यशवंतराव चव्हाण यांच्यासह पुर्ण चव्हाण कुटुंबीयांनी सर्व क्षेत्रात गरूडझेप घेतली. परंतु मातृ छत्र हरवलेल्या अमोल व सुजित या भावंडांना चव्हाण व आजोळ असलेल्या शिंदे कुटुंबीयांनी आई कावेरीताईंची उणीव भासू दिली नाही.तसेच वडील असलेले मुख्याध्यापक बि.वाय.चव्हाण यांनी प्राथमिक ते उच्च शिक्षणाबरोबरच लोहा, नांदेड, पुणे,दिल्ली येथील मुलांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करून शाबासकीची थाप देत राहिले असल्याने तसेच शिक्षण घेत असताना वा कोणतेही कार्य करत असताना अथक परिश्रम, जिद्द,कुटुंबाची प्रेरणा व आशीर्वाद असेल तर नक्कीच यशोशिखर गाठता असल्याची प्रतिक्रिया जालना येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक चे नुतन सहाय्यक व्यवस्थापक अमोल बालाजीराव चव्हाण यांनी दिली. मोठे बंधू सुजित कावेरीताई बालाजी चव्हाण तर धाकटे बंधू अमोल कावेरीताई बालाजी चव्हाण यांना अनुक्रमे किनवट व जालना येथे कामावर रूजू झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या यशाबद्दल माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी नगराध्यक्षा सौ.आशाताई रोहिदास चव्हाण, माजी जि.प.सदस्य प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे, प्रा. डॉ.मनिषाताई धोंडगे,जिल्हा नियोजन समिती सदस्य नवनाथ उर्फ बापू चव्हाण,शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण,शिक्षक नेते विठू भाऊ चव्हाण,नगरसेवक संभाजी पाटील चव्हाण,माजी चेअरमन तथा मुख्याध्यापक बि.वाय.चव्हाण,नगरसेवक जीवन चव्हाण,प्रा.मारोती चव्हाण,माजी सरपंच मथुराबाई शिंदे,संचालक भीमराव पाटील शिंदे, हरी पाटील शिंदे,स्टेट बँक ऑफ इंडिया चे नांदेड शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर नवघरे,माजी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार,शिवकुमार परांडे,अभियंता गजानन मोरे,राष्ट्रवादी विद्यार्थी जिल्हा सरचिटणीस राहुल लोंढे,गजानन जामगे,मुकुल पवार,दीपक कौटेकर,मदन बोकारे,महेश चव्हाण यासह सामाजिक, शैक्षणिक,राजकीय,पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांसह आप्तस्वकीय मित्रमंडळींनी अभिनंदन केले आहे.