दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:नांदेड शहरात एक कंपनी बोगस बियाणे तयार करत असल्याची गुप्त माहिती मिलाल्यानंतर कृषी विभागाने कंपनीवर छापा टाकला. यावेळी कंपनीत अनेक प्रकारचे बोगस बियाणे तयार करत असल्याचे आढळून आले.बोगस बियाणांचे उत्पादन करून त्याची विक्री करणाऱ्या कंपनीवर कृषी विभागाने छापा टाकला आहे. या छाप्यात कृषी विभागाने शेकडो क्विंटल बोगस बियाणे जप्त केले आहे. नांदेड शहरातील अर्धापूर रोड वरील एका गोदामात मयुरी सिड्स आणि बुलेट ऍग्री प्रॉडक्ट्स ही कंपनी बोगस बियाणांचे उत्पादन करत होती. कृषी विभागाने छापा टाकून या कंपनीचा भंडाफोड केलाय. या कंपनीत सोयाबीन, उडीद , हरभरा हा बियाणे तयार केली जात होती.