दैनिक चालू वार्ता नांदुरा प्रतिनिधी- किशोर वाकोडे
फुली(नांदुरा) :दि. २८.भारतीय बौद्ध महासभेच्या केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या वतीने राज्यस्तरीय केंद्रीय शिक्षक प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ( चैत्यभूमी) दादर मुंबई येथे हे प्रशिक्षण दि.२२ मे ते २७ मे २०२२ दरम्यान पार पडले. ह्यावेळी सहभागी ६५ प्रशिक्षणार्थ्यांनी दिलेल्या लेखी परीक्षेत बुलडाणा जिल्हा महिला सचिव दिपाली पंडीत इंगळे हिने ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. सदर पुरस्कार भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय महासचिव जगदीश गवई तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.इतर तीन प्रशिक्षणार्थी मध्ये पद्ममीनी शेषराव तायडे ( खामगांव)रोशणी संजय सरदार ( शेगांव)व सुनिता अशोक वानखडे ( मोताळा)यांनी परीक्षेत यश संपादन केले. बुलडाणा जिल्हा उत्तर मधुन राज्यातून द्वितीय आलेल्या दिपाली इंगळे यांचे जिल्हा अध्यक्ष एस. एस .वले ,सरचिटणीस बी. के .हिवराळे व कोषाध्यक्ष के.के.शेगोकार ,नांदुरा तालुका अध्यक्ष दिलीप मेढे यांनी अभिनंदन केले आहे.