मौजे हंगरगा पक ता मुखेड येथील चौकशीच घोड आडलं कुठं ?
मनसेचा पंचायत समिती मुखेड वर २५ऑक्टोबर रोजी पुन्हा गाढव मोर्चा
दै.चालू वार्ता
मुखेड ता प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मौजे हंगरगा प.क. ता मुखेड येथील झालेल्या वित्त आयोगा मार्फत व इतर अनेक कामाची चौकशी करण्याबाबत दि.२७.८.२०२१ खोबरतेल लावून बोंब मारो आंदोलन केले त्यावेळी मा.गटविकास अधिकारी साहेब आश्वासन दिले होते की येणाऱ्या ८ ते १० दिवसात योग्य चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल पण आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी झाली नसल्यामुले मा.गटविकास अधिकारी साहेब यांचा घोडा कुठे आडला समजत नाही.याचे स्पष्टीकरण मा गटविकास अधिकारी यांनी केले तर बरे होईल.अन्यथाआम्ही २५आक्टोबर रोजी पंचायत समितीसमोर गाढव मोर्चा घेऊन येऊ असे प्रतिपादन संतोष बनसोडे (मनसे मुखेड तालुकाध्यक्ष) यांनी केले.
तसेच मनसे शेतकरी सेना तालुकाध्यक्ष हरिदास दिंडे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून आंदोलन उभारून गावकऱ्यांच्या मदतीने ती चौकशी करण्यात यावी यासाठी तक्रार केली पण संबंधित गटविकास अधिकारी हे प्रकरण गांभीर्याने घेत नाहीत चौकशी करत नाहीत वेळ टाळून नेत असल्याची प्रतिक्रिया दिंडे यांनी दिली व चौकशी का होत नाही ह्यावर संबंधित गटविकास अधिकारी यांच काही गोलमाल असल्याचे बोललं जात आहे. तरी गटविकास अधिकारी यांनी आपली थांबलेली चौकशी पुढं चालू करा समिती गठीत करून चौकशी करण्याचे सूचना करावी.गावातील एकदरित सर्व कामाची चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्यात यावी.
अन्यथा २५ऑक्टोबर रोजी पंचायत समिती कार्यालयावर गाढव मोर्चा मोर्चा काढण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.