दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : विविध माध्यमातून अनामत रकमेपैकी जमा झालेली रक्कम पालिकेकडून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मुदत ठेवींच्या स्वरुपात ठेवली जाते. कोरोनाच्या काळात मुदत ठेवींवर अल्प म्हणजे ४ ते ५ टक्केच व्याज मिळत आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान झाल्यामुळे पालिकेने मुदत ठेवींचा पॅटर्न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. आता रक्कम बँकेत मुदत ठेवींच्या ऐवजी शासकीय योजनेच्या कर्जरोख्या (बाँड) मध्ये गूंतविली जाणार आहे. या गुंतवणुकीतून दोन ते अडीच टक्के व्याजाचे जादा उत्पन्न मिळणार आहे. म्हणून प्रशासन १ हजार कोटी रूपये बाँडमध्ये गुंतवणूक करणार आहे. ७०० कोटी बँकेत मुदत ठेवी म्हणून गुंतवणे तसेच २१० व ४९० कोटी रूपये सरकारी कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणे असे प्रस्ताव स्थायी समितीमध्ये मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. परंतु सध्या स्थायी समिती अस्तित्वात नाही. त्यामुळे गुंतवणुकीचे सर्व अधिकार मा. आयुक्तांकडे जातात. या अधिकारान्वये आयुक्त नवीन पॅटर्न बाबत योग्य निर्णय घेतील आणि महानगरपालिकेस जादा उत्पन्न मिळवून देतील अशी अपेक्षा आहे