दैनिक चालु वार्ता पुणे प्रतिनिधी -शाम पुणेकर.
पुणे : कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून बी.ए.४ आणि बी.ए.५ या दोन व्हेरिएंटने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. पुण्यात या दोन्ही व्हेरिएंटचे एकूण ७ रूग्ण आढळून आले आहेत. बीए ४ आणि ५ या विषाणूं मुळे सध्या सारे जग चिंताग्रस्त आहेत. भारतात सर्वात प्रथम हा विषाणू पुण्यातच दाखल झाला असून एकूण सात रुग्ण आढळले आहेत. ही बाब जिनोम सिक्वेसिंगच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे प्रशासनाने कळविले आहे.