दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
राज्यात तळागाळापर्यंत काँग्रेस पक्षाची विचारधारा पोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत- अविश राऊत
पालघर;- शुक्रवार दिनांक 27 मे 2022 रोजी लायन्स क्लब पालघर येथे हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे सर्वेसर्वा अविश राऊत यांनी काँग्रेस कमिटी प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला. महाराष्ट्र काँग्रेस कमिटी मध्ये पँथर अविश राऊत यांचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता असे महत्वाचे आणि जबाबदारीचे पद जाहीर करण्यात येऊन , सन्माननीय पटोळे साहेब यांनी अविश राऊत यांचे खंदे समर्थक जगदीश राऊत पालघर जिल्हा मुख्य उपाध्यक्ष , अरशद जमशेद खान पालघर जिल्हा मुख्य उपाध्यक्ष , बिंबेश जाधव पालघर जिल्हा उपाध्यक्ष , रोहित चौधरी पालघर जिल्हा उपाध्यक्ष ,अनिल गायकवाड पालघर जिल्हा उपाध्यक्ष , भावेश दिवेकर पालघर जिल्हा सरचिटणीस , भरत महाले पालघर जिल्हा सरचिटणीस , निलेश गायकवाड पालघर जिल्हा चिटणीस , चंद्रसेन ठाकूर पालघर तालुका मुख्य उपाध्यक्ष , अजिंक्य म्हस्के पालघर जिल्हा युवा मुख्य उपाध्यक्ष , सलमान खान पालघर तालुका युवा मुख्य उपाध्यक्ष , मोहिनी जाधव पालघर जिल्हा मुख्य उपाध्यक्षा , मरिना रिबेलो पालघर जिल्हा महिला उपाध्यक्षा , स्नेहा जधाव पालघर जिल्हा महिला सरचिटणीस , ऍड .दीपाली दिनकर वानखेडे पालघर तालुका महिला उपाध्यक्षा यांच्या महत्वाच्या पदी नियुक्त्या करण्यात आल्या. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सन्मानीय नानाभाऊ पटोले यांनी देशात काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे जो शोषित वंचित समूह तसेच तळागाळातील सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकतो . आणि देत आला आहे. काँग्रेस पक्ष नेहमी कामगारांच्या बाजूने राहिला असून ,जिल्ह्यात कामगारांचे प्रश्न , विराज कंपनीत झालेल्या कामगारांच्या मारहानी बाबत संपूर्ण माहिती घेतली जाईल व कष्टकरी जनतेचे प्रश्न ,शेतकऱ्यांचे प्रश्न,मजुरांचे प्रश्न, पुनर्वसनाचा प्रश्न , ओबीसी आरक्षण तसेच अनेक महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असून , जिल्ह्यात होत असलेल्या बंदरांमुळे तसेच देहर्जे व सुर्या प्रकल्पामुळे प्रकल्पग्रस्तांवर झालेल्या अन्याया मुळे जर जनता त्रस्त व स्थानिक जनता दुःखी असेल तर काँग्रेस पक्ष सदैव जनते सोबत आहे आणि राहणार अशी ग्वाही उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. पँथर अविश राऊत यांनी राष्ट्रीय पँथर्स आघाडी काँगेस पक्षा सोबत या नंतर आंदोलने , मोर्चे , निवेदने ,निदर्शने राज्यात संयुक्त रित्या करणार असून, प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात , विभागात ,शहरात गावपाड्यात काँग्रेस आणि काँग्रेसची विचारधारा पोचवण्याचे प्रामाणिक काम आम्ही सर्व काँग्रेसचे जेष्ठश्रेष्ठ कार्यकर्ते मिळून करणार आहोत. देशात , राज्यात काँगेस बाबत जी चुकीची विचारसरणी पसरविण्याचे काम ज्या व्यवस्थेने केले आहे. त्याची सत्यता आम्ही जनतेसमोर मांडण्याचे प्रयत्न करणार आहोत. तसेच मला काँग्रेस मध्ये आणण्यासाठी ज्या प्रमुख लोकांनी प्रयत्न केले त्यात आमचे मित्र सलीम पटेल , माझे मार्गदर्शक सिकंदर शेख आणि यशवंत सिह ठाकूर साहेब यांचे विशेष आभार मानले. यावेळी अविश राऊत यांच्यावर प्रेम आणि विश्वास करणारे राष्ट्रीय पँथर्स आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पारप्पा ढावरे , मराठवाडा संपर्क प्रमुख बाळासाहेब जाधव तसेच , पालघर जिल्हा , तालुका ,महिला , युवा प्रमुख कार्यकारणी ,सामर्थक , हितचिंतक उपस्थित होते .तसेच जिल्ह्यातून आलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी राऊत यांच्या समवेत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केले. प्रचंड निर्माण झालेल्या गर्दी मुळे परिणामी अनेक कार्यकर्त्यांना बसायला जागा उपलब्ध नसल्याने त्यांनी कॅरिडॉरचा ताबा घेतला होता तसेच बाल्कनीमध्ये ही जागा उपलब्ध नसल्याने शेकडो कार्यकर्त्यांना शेवटी लायन्स क्लबच्या खाली बाहेर उभे राहावे लागले होते. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांमध्ये सन्माननीय नानाभाऊ पटोले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष, यशवंत सिंह ठाकुर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चिटणीस , विजय पाटील महा. प्र. सरचिटणीस , सौ संगीताताई धोंडे महाराष्ट्र महिला उपाध्यक्षा , योगेश नम साहेब सेक्रेटरी महाराष्ट्र प.कॉ.कमिटी ,राजेश घोलप म.प्रदेश चिटणीस सह प्रभारी वसई जिल्हा काँग्रेस , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ऍड. जि डी तिवारी , सिकंदर शेख , प्रफुल पाटील पालघर जिल्हा अध्यक्ष , राजेश अधिकारी पालघर तालुका अध्यक्ष , ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सलीम पटेल , सचिन भाऊ शिंगडा उपाध्यक्ष पालघर जिल्हा , श्री अरविंद सिंह क्षत्रिय उपाध्यक्ष पालघर जिल्हा ,शैलेश ठाकूर , बच्चा सेठ ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष, सुरेंद्र भाई शेट्टी जील्हा सरचिटणीस , मनिष गनोरे सर माजी जिल्हा अध्यक्ष व चिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी , ऍड. सुधीर भाई जैन मेंबर वकील संघटना प्रदेश ,ओमकार सोनावले उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल, समीर वर्तक अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश पर्यावरण सेल, मनिषा सावे मॅडम महिला जिल्हा अध्यक्ष, सरयु अवसरकर मॅडम कार्याध्यक्ष महिला पालघर जिल्हा व शैला ताई प्रसाद , डहाणू तालुका अध्यक्ष श्री संतोष मोरे , विक्रमगड तालुका अध्यक्ष श्री घनश्याम आळशी , मोखाडा तालुका अध्यक्ष श्री जमाशेद लारा, वसई तालुका अध्यक्ष ग्रामीण राम पाटील , अस्मिता पंडित ताई उपाध्यक्ष महिला तालुका , चौधरी मॅडम अध्यक्ष वसई विरार महिला ,मंगेश भाई पंडित उपाध्यक्ष पालघर तालुका , आसिफ मेमन भाई अल्प संख्यांक अध्यक्ष पालघर जिल्हा , पालघर जिल्हा युवा अध्यक्ष सत्यम ठाकूर, रविश भाई नाचन अध्यक्ष मनोहर शहर , संदीप मेने , चिराग देसाई , किरणं अप्पा , मनिषा काळपुंदे , महेश भाई देसाई , शहर अध्यक्ष श्री मनोहर दांडेकर , सुनिल भाऊ इंगोळे ,अमजद खान , रज्जन मिश्रा ,विठ्ठल पाटील वारकरी संप्रदाय , मंदार संखे बोइसर शहरध्यक्ष, उदय संखे बोईसर विभाग अध्यक्ष तसेच अनेक जेष्ठश्रेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते