दैनिक चालू वार्ता पालघर प्रतिनिधी:-अनंता टोपले
बांधकाम विभाग व ठेकेदार यांचा आदिवासी चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ
पालघर – जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आले असून ठेकेदार आणि बांधकाम विभाग यांचा आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करत असल्याचे चित्र समोर आले आहे. मोखाडा तालुक्यातील मडक्याच्यामेट येथे सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या दुरुस्तीचे काम थातूर-मातूर पद्धतीने करण्यात येत आहे असे इथल्या स्थानिक नागरिकांच म्हणणं आहे.
मागील दोन वर्षे कोरोनामुळे शाळा बंद अवस्थेत असल्याने तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची देखभाल दुरुस्ती अभावी दुरावस्था झाली आहे. अशातच मडक्याचीमेट येथील जि.प.शाळेचे दुरुस्तीचे बांधकाम ठेकेदाराकडून अतिशय निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांनी उघडकीस आणले आहे. बांधकामासाठी वापरण्यात येत असलेले रेती, सिमेंट सारखे साहित्य अतिशय अल्प दर्जाचे असून यामुळे जि.प. बांधकाम विभागाचे अभियंता आणि ठेकेदार हे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याची बाब उघड दिसून येत आहे.
ठेकेदाराला काळ्या यादीत टाका’ : एकीकडे शासनाकडून जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्या करीता व जिल्हा परिषद शाळांमधील पट संख्या वाढावी,दर्जा सुधारावा यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र या सर्व बाबींचे कुठेही काटेकोर पालन होत नसून शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचे काम संबंधित अधिकारी यांना हाताशी धरून पुढारी-ठेकेदार करत आहेत. मात्र या सर्व बाबींची चौकशी होणे गरजेचे असताना ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम केले जात आहे. अशा ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकां कडून करण्यात येत आहे. दरम्यान याच पिलरवर इमारत उभी राहिल्यास कधीही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींची सखोल चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका, अशी मागणी आता मडक्याची मेट येथील नागरिक म्हणत आहे.
आमच्या गावात होत असलेल्या शाळेचं काम हे अतिषय निकृष्ट दरजेच आहे या शाळेचा ठेकेदार हा स्वतः जिल्हा परिषद सद्यस्य आहे त्या मुळे त्यांचा जिल्ह्यात व तालुक्यात मोठा दबदबा आह परंतु त्यांना सामान्य माणसाची काहीही किमंत राहिली नाही का? की फक्त स्वतःचे खिशे भरायचे आम्ही सामान्य माणसांनि जाब कुणाला विचारावा..
मडक्याचिमेट स्थानिक गावकरी(श्री.सचिन वारघडे)