दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
सामाजिक व धार्मिक क्षेत्रात सदा अग्रेसर असणारे विश्वकर्मा समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माधव पांचाळ यांचा लोहा येथील व्यंकटेश गार्डन मध्ये अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
विश्वकर्मा समाज बांधवांच्या विकासासाठी तळमळ असणारे समाजाचे प्रश्न सोडविणारे भगवान विश्वकर्मा यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवून समाजाला संघटित करणारे लोहा येथील तरुण तडफदार युवा नेते माधध पांचाळ यांचा आज दि.२८ मे रोजी वाढदिवस आहे त्यांच्या या वाढदिवसानिमित्त त्यांनी सकाळी ११ वाजता भोगाव येथील प्रसिद्ध मारोती यांचें दर्शन घेऊन त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा लोहा येथील व्यंकटेश गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांच्यावर विश्वकर्मा समाज बांधवांसहित सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर पत्रकार बांधव यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
त्यानंतर माधव पांचाळ यांच्या वतीने सर्वाना स्वादिष्ट व रुचकर स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यांचा लाभ सर्वांनी घेतला.
माधव पांचाळ यांना वाढदिवसानिमित्त लोहा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, नगरसेवक करीम शेख, उद्योजक भीमाशंकर मामा कापसे, नगरसेवक अमोल व्यवहारे, नगरसेवक नबीसाब शेख, नगरसेवक केतन खिल्लारे,दिपक पाटील कानवटे, सचिन मुकादम, जेष्ठ पत्रकार साहेबराव सोनकांबळे, पत्रकार विलास सावळे, पत्रकार केशव पाटील पवार, पत्रकार बाळासाहेब कतूरे पत्रकार गोविंदराव पाटील कदम, पत्रकार रत्नाकर महाबळे, पत्रकार शेख मुरतुजा, पत्रकार प्रविण महाबळे, विशाल घंटे , गुलाम शेख,
आदी ने शुभेच्छा दिल्या.