दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर वाणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार मा.श्री बालू भाऊ धानोरकर यांना निवेदन देण्यात आले
चंद्रपूर–
दिनांक 28/05/2022 ला चंद्रपूर जि. पालकमंत्री मा. विजय भाऊ वड्डेटीवर, चंद्रपूर वाणी आर्णी लोकसभा क्षेत्रचे खासदार मा.श्री बालूभाऊ धानोकार,चंद्रपूर जि. काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष मा.श्री प्रकाशभाऊ देवतळे,प्रदेश महासचिव यु.काँग्रेस महाराष्ट्र. मा.शिवानीताई वड्डेवार, उपाध्यक्ष जि.यु काँग्रेस चंद्रपूर मा.श्री रमीज भाई शेख,जिल्हाध्यक्ष ग्रामीण यु.काँग्रेस चंद्रपूर मा.श्री शंतनूभाऊ धोटे यांचा मार्गदर्शनाखाली व बल्लारपूर तालुका अध्यक्ष ग्रा. काँग्रेस मा.श्री विनोद भाऊ बुटले आणि नांदगावचे काँग्रेस युवा नेता मा.देवानंदभाऊ शेंडे व विसापूरचे बल्लारपूर विधानसभा सचिव यु.काँग्रेस चंद्रपूर मा.प्रितम पाटणकर,यांचा नेतृत्व मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनीरिंग चंद्रपूर इथे मायनींग इंजिनीरिंग ब्रांच सुरु करण्यात यावे या करिता चंद्रपूर -वाणी आर्णी लोकसभा क्षेत्राचे मा.श्री बालूभाऊ धानोरकर यांना देण्यात आले निवेदन तसेच आपले चंद्रपूर जि. कोल सिटी म्हणून ओळख आहे. जि. मधील कोल खदान जास्ती जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना जमिनी सुद्धा कोल खाणी साठी घेतात व तरुण मुलांनी जर गव्हर्नमेंट कॉलेज मधून मायनींग इंजिनीरिंग डिग्री घेऊन उच्च पदावर नौकरी प्राप्त करू शकणार व आपले विदर्भमध्ये चंद्रपूर जि.मध्ये बेरोजगारी प्रश्न निर्माण होऊन आहेत आणि दुसऱ्या राज्याचे, जिल्हाचे मुलं इकडे येऊन नौकऱ्याकरीत आहेत म्हणून आपले स्थानिक तरुण मुलांना नौकऱ्या भेटून राहले नाही आहे म्हणून मायनींग इंजिनीरिंग शिक्षण घेऊन गव्हर्नमेंट डिग्री प्राप्त करुंन शेतकऱ्यांनाचे,गरिबांचे मुलं सुद्धा कोल. कंपनीमध्ये नौकऱ्या करू शकणार तसेच खागजी इंजिनीरिंग कॉलेज मध्ये मायनींग इंजिनीरिंगचे शुल्क खूब असल्यामुळे गरिबांचे मुलं मायनींग इंजिनीरिंग शिक्षण प्राप्त करू शकत नाही आहेत असे निवेदन मार्फत कळविण्यात आले.