दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतीनीधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर – गाजगांव येथे एका शेतकऱ्यास चार जंणानी लाथा बुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अर्जुन हीवाळे यांच्या फीर्यादिवरुन शिल्लेगांव पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसाकडून मिळालेल्या माहितीनुसार
गंगापूर तालुक्यातील गाजगांव येथील अर्जुन शिवनाथ हिवाळे हे बि बियाण्याच्या दुकानात काम करीत असताना त्यांच्या वडिलांनी फोन द्वारे माहिती दिली की शेतात बापुराव दवंडे , रऋषीं देवडे, प्रशांत दवंडे, ऊत्तम दवंडे या चार जंणानी फीर्यादीस तसेच
वडील, काकास व चुलत भावास शिविगाळ करत लाथा बुक्क्यानी मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.