दैनिक चालु वार्ता औरंगाबाद प्रतिनिधी -मोहन आखाडे
औरंगाबाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची ८ जून रोजी ऐतिहासिक मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे सभा होणार आहे. त्यामुळे पुरुषांसह माता भगिनींनो या गिफ्ट दिले अतिविराट सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.
समर्थनगर येथील वरद गणेश मंदिर सभागृहात पूर्वतयारी लसाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते.
मराठवाड्यात सर्वप्रथम स्थापन झालेल्या शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी १ जूनपासून विविध सामजिक कार्यक्रम घेऊन वर्धापन दिन साजरा होणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावागावांत व वॉर्डावॉर्डात प्रत्येक घरात किचनपर्यत शिवसेनेचे विचार पोहचवण्याची जबाबदारी महिला आघाडी यांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हासंघटक राखी परदेशी, जिल्हा समनव्यक कला ओझा, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, सह संपर्क संघटक सुनीता देव, माजी महापौर नंदकुमार घोडेले, उपजिल्हाप्रमुख बंडू ओक यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील महिलांनी आतापासून गावागावात जाऊन व शहरात वॉर्डावॉर्डात जाऊन बैठका घेऊन तयारी करावी, असे आवाहन बैठकीत सांगण्यात आले. बैठकीस शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद तांदूळवाडीकर उपशहरप्रमुख विजय सुर्यवंशी माजी नगरसेवक सचिन खैरे, विनोद बोरखडे, युवती सेनेच्या पूजा कायंदे, शिवअंगणवाडी सेनेच्या जिल्हासंघटक राखी सुरडकर, विमल काळे, अलका कांदे, रेणुका जोशी, मंजुषा पाईकराव, उपजिल्हासंघटक अंजली मांडवकर, अनिता मंत्री, नलिनी बाहेती, दुर्गा भाटी, मीना फसाटे, पुष्पा गव्हाणे, हर्षली मुठ्ठे, जयश्री लुंगारे,
विधानसभा संघटक मीरा देशपांडे, नलिनी महाजन, लक्ष्मी नरहिरे, शहर संघटक भागूबाई शिरसाठ, विद्या अग्निहोत्री, आशा दातार, प्राजक्ता राजपूत, तालुका संघटक वर्षा जाधव, अर्चना सोमासे, मंगल कापरे, अनुसया शिंदे, सुलभा भोपळे, रेखा मोदी, मनीषा बिराजदार, किरण शर्मा, कांता गाढे, देवयानी सीमंत, मीरा पाटील, छाया जाधव, ज्योत्स्ना सोनवणे, सुचिता आंबेकर, चंद्रकला चव्हाण, आरती मोहिते, रोहिणी काळे, संध्या रावेलू, जिगण्या शाह, माजी नगरसेविका शिल्पा वाडकर, स्वाती नागरे, शोभा सिंगीकर, गीता राठोड, मंगल पडवळ, मीरा भगुरे, छाया देवराज, सानिका देवराज,वैष्णवी खरात, यमुना झिने, आशा शिंदे, सुनीता गायकवाड, शशिकला शेजुळ, मीना खोतकर, खरात, बबिता गायकवाड, सुवर्णा सूर्यवंशी, जयश्री पोफळे, वनमाला पटेल, उमा जैस्वाल, पुष्पा नलावडे, दीपाली मोहिते, संगीता पाकोळू, राज्यश्री राणा, निशा पडावे, रंजना आहेर, सीमा गवळी, संगीता पाठक, ऐश्वर्या जगताप, रजनी न्यायाधीश, कविता सुरळे, शारदा लोखंडे, शारदा घुले, अपर्णा रामवात, मंजुषा पाईकराव, प्रज्ञा जठार, सपना चिंतलवार, उज्वला बिरारीस, निर्मला सोनवणे, कल्पना बावणे, जयश्री नरवडे, विद्या खाडिलकर, लक्ष्मी काळे, शशिकला बारगळ, रेखा शाह, लता शंकपळ, सुनीता कांबळे, नीता रेड्डी, अरुणा भाटी, अनिता खोडकर, मीना पांडे, मीनाक्षी नखाते, जमुना ठाकूर, सविता मिसाळ, शारदा राऊत, प्रेमलता चंदन, सुमित्रा डिकोवर, जयश्री इंदापूरे, विजया त्रिभुवन, शीतल जाटवे, शिवअंगणवाडी सेनेच्या अनिता थोरात, कल्पना भुईंगड, छाया जाधव,माया देशमुख,मिरा भगूरे, वैशाली महाले , दिपाली मोहिते , कल्पना बावणे, संगिता पाटोळे, ध्रृपदा सुर्यवंशी, संगिता धोत्रे,रिमा खोतकर, मंजु सौदा, कविता गायकवाड, जनाबाई जाधव, वंदना महाले, संगिता नरवडे, शिल्पा गावंडे, मंगल ढोके, जयश्री नरवडे, संगिता अंभोरे, आदींसह महिला उपस्थित होत्या.