दैनिक चालु वार्ता नांदुरा प्रतिनिधी -किशोर वाकोडे
मलकापूर: दि.२९.शहरात अद्यावत सर्व सुविधायुक्त वातानुकुलीत अभ्यासिकेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मा.आमदार राजेश एकडे यांच्या अथक प्रयत्नाने ६.१५ कोटी रुपयांच्या अभ्यासिकेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सोहळा मोठ्या थाटामाठात पार पडला. त्यावेळी ते म्हणाले ग्रंथालय (अभ्यासिका) हे व्यक्तीच्या ज्ञानाचा विस्तार करण्यासाठी अत्यंत उपयुक्त माध्यम आहे, सरासरी वर्गातील व्यक्ती त्यांच्या आवडीची किंवा गरजेची सर्व महागडी पुस्तके विकत घेऊ शकत नाही, आणि पैशाच्या अभावामुळे ति व्यक्ती ज्ञान आणि शिक्षणापासून वंचित राहते. पण ग्रंथालयाच्या माध्यमातून सर्व प्रकारची पुस्तके आणि त्यांचे ज्ञान तो सहज मिळवू शकतो. कारण माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तके, दुसरी म्हणजे भेटलेली माणसे. कारण पुस्तक माणसाला प्रगल्भ करण्याचे काम करत असतात. म्हणतात ना गरीब लोकांकडे मोठा टीव्ही असतो आणि श्रीमंत लोकांकडे मोठे ग्रंथालय असते. पुस्तकांसारखा दुसरा कोणी मित्र नाही, ते आपले अंतरंग खुले करते कधी चुकवत नाही की फसवत नाही. समाजाच्या हितासाठी ज्या ज्ञानाचा उपयोग होत नाही ते ज्ञान काही कामाचे नसते, परंतु जगात अश्या व्यक्ती आहेत की ग्रंथालया मधून वाचलेल्या पुस्तकाचा उपयोग हा समाजासाठी निश्चितच करीत असतात.आपल्या या अभ्यासिकेतून निश्चितच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन मोठा अधिकारी वर्ग मलकापूर मतदारसंघात तयार झाल्याशिवाय राहणार नाही.
जगात सर्वात जास्त पुस्तकांची किंमत ओळखणारे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात एक ग्रंथालय बांधणे म्हणजे लाखो विद्वान निर्माण करणे होय.
अशा या भव्य दिव्य ग्रंथालयाच्या अभ्यासिकेच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित सर्व बुद्धिजीवी वर्ग अतिशय गर्वाने-अभिमानाने बोलत होता की आमदार राजेश एकडे यांनी दोन रस्ते कमी केलेत तरी त्यांच्याविषयी आमची काहीही नाराजी राहणार नाही, कारण त्यांनी आम्हाला ज्ञानाच्या अथांग सागराचे दालन खुले करून दिले. त्याबद्दल मलकापूर मतदारसंघातील सर्व बुद्धिजीवी वर्ग,विद्यार्थी, पालक त्यांचा सदैव ऋणी राहील.अशी प्रतिक्रिया कार्यक्रम संपल्यानंतर अभ्यास करणारे विद्यार्थी पालक व बुद्धिजीवी वर्ग आपसात चर्चा करून आमदार महोदयांचे आभार व्यक्त करत होते.
मलकापूर मतदारसंघांमध्ये एका शहरात एकाच कामासाठी एवढा मोठा निधी उपलब्ध करून देणे,ही गोष्ट मलकापूर मतदार संघाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिल्या जाईल यामध्ये शंकाच नाही.कारण हा एक इतिहास झाला एका कामासाठी एवढा निधी आजपर्यंत कोणीही उपलब्ध करून दिला नाही. अतिशय थाटामाटात भूमिपूजनाचा कार्यक्रम विधिवत पार पडला. त्यावेळी उपस्थित मान्यवरांचे समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.हरिषभाऊ रावळ होते तर प्रमुख उपस्थिती डॉ. अरविंदजी कोलते,अँड.साहेबरावजी मोरे, हाजी रशीदखान जमादार, शामभाऊ राठी, मनोजभाऊ देशमुख, किशोरभाऊ नवले, अरुणभाऊ अग्रवाल, प्रमोददादा अवसरमोल,सौ. मंगलाताई पाटील, बंडूभाऊ चौधरी,अँड. जावेद कुरेशी, राजेंद्र वाडेकर,रमेशसिंहदादा राजपूत, सोपानराव शेलकर, वसंतराव भोजने, बाळूभाऊ पाटील, तसेच वैद्यकीय, राजकीय,सामाजिक,पत्रकारिता व विशेष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवर,बुद्धिजीवी, जिज्ञासू, अभ्यासक वर्ग प्रामुख्याने उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या आयोजनाची, नियोजनाची सर्व जबाबदारी मलकापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजुभाऊ पाटील यांनी अतिशय चोखपणे पार पाडली. सूत्रसंचलन शिरीषभाऊ डोरले यांनी केले तर आभार प्रदर्शन बंडूभाऊ चवरे यांनी करून कार्यक्रमासाठी समाधान इंगळे सर, अनिलभाऊ मुंधोकार, विनोद बिराडे, भूषण सनीसे, ईश्वर भदाले,राजू उखर्डे, विनुभाऊ काळे आदींनी परिश्रम घेतले.