दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
पुणे : गावाचा विकास अधिक गतीनं होण्यासाठी तयार करण्यात आलेली पेठ ग्रामपंचायतीची नूतन इमारत गावाच्या वैभवात भर घालणारी आहे. पेठ ग्रामपंचायत नूतन इमारतीच्या माध्यमातून गावाच्या विकासाला गती मिळेल, असं प्रतिपादन हवेली तालुक्यातील पेठ ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाप्रसंगी केलं. पेठ ग्रामपंचायत इमारतीत बसणारे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी ग्रामपंचायत परिसरातील सर्व गरजूंची व नागरिकांची सर्व कामं त्वरित करावी. ग्रामस्थांना शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि त्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न आवश्यक आहेत. शासनाच्या योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत हे महत्त्वाचं ठिकाण आहे. या ठिकाणाहून लोकाभिमुख, पारदर्शक, प्रामाणिक व सचोटीनं काम करावं. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीनं योगदान द्यावं, असं आवाहन आहे. कोरोना, अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटाचा सामना करत राज्यातील विकासकामांना गती देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या विविध योजना तसंच जिल्हा वार्षिक योजना, जिल्हा परिषदेच्या योजना, आमदार निधीच्या माध्यमातून गतीनं विकासकामं सुरू आहेत. शहरी भागासोबतच ग्रामीण भागाचा समतोल विकास करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पेठ गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. मान्सूनचं आगमन वेळेत होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे, त्यादृष्टीनं खरीपाची तयारी करून ठेवावी. शेतकऱ्यांना खतं, बियाणं कमी पडणार नाहीत, त्याबाबतचं काटेकोर नियोजन करण्यात आलं आहे. पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या पीक कर्ज योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन आहे.