दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांतील खटाव तालुक्यांतील विसापूर गावचे सुपुत्र सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांना लडाखमध्ये शुक्रवारी झालेल्या बस अपघातात सहा जवानांना वीरमरण आले. यात सुभेदार विजय शिंदे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रशांत जाधव यांनाही वीरमरण आले समजताच विसापूरसह तालुक्यांत शोककळा पसरली सुभेदार शिंदे यांचे पार्थिव लडाख मधून पुण्यापर्यंत सैन्यदलाच्या विमानाने आणण्यांत आले रविवारी सकाळी दहांच्या सुमारांस पार्थिव विसापूर मध्ये पोहोचल्यानंतर दुपारी दीड वाजता सुभेदार विजय शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यांत आला. पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासांठी तसेच शहीद जवानांला निरोप देण्यासांठी सातारा जिल्ह्यांतील हजारो जनसागर लोटला होता. सुभेदार शिंदे यांचे सुरुवातीला पार्थिव त्यांच्या घरी पोहोचताच त्यांच्या कुटुंबियांनी व नातेवाईकांनी एकच आक्रोंश केला. यावेळी अनेकांना आपले अश्रूं आवरता आले नाहीत त्यानंतर वाघेश्वरी मंदिर चावडी समोर विजय शिंदे यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यांत आले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार महेश शिंदे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विधाते ,काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव ,तहसीलदार किरण जमदाडे , पुसेगांव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले त्यानंतर सुभेदार विजय शिंदे यांची सजवलेल्या रथांतून अंत्ययात्रा काढण्यांत आली संपूर्ण गावांतील रस्त्यावर आकर्षक रांगोळी पुष्पवृष्टी करण्यांत आली. वीर जवान विजय शिंदे अमर रहेचे चौकाचौकात फलेक्स बोर्ड मोठ्या संख्येने लावण्यांत आले.