दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
वाई लोहारे येथील सागर शिवाजी सावंत वय २७ रा. लोहारे गावच्या हद्दीतील स्मशानभूमींतील लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत फिर्याद चुलते सतीश सर्जेराव सावंत यांनी वाई पोलीस ठाण्यांत फिर्याद दाखल केली. याबाबत पोलिस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन मयत सागर सावंत याच्या घरातील सदस्य गुरुवार दि.२६ रोजी नातेवाईकांच्या लग्नांला गेले होते. गुरुवारी सायंकाळी सागरची आई घरी आली सागर दिवसभर शेतात खत भरण्यांचे काम करीत होता.रात्री साडेनऊ वाजता तो जेवण न करताच झोपायला जातो असे सांगून घराबाहेर पडला सकाळी त्याचा मित्र शेतात कामाला बोलवण्यासांठी आला असता. आईने सागर झोपायला गेला आहे असे त्याच्या मित्रांला सांगितले तरी तो अद्याप अजून पर्यंत आला नसल्यांचे सांगितले मित्रांने परिसरांत शोधाशोध केली असता सागरने स्मशानभूमींत लोखंडी अँगलला टॉवेलच्या सहाय्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत वाई पोलीस अधिक तपास करीत आहेत.