दैनिक चालू वार्ता गंगापूर प्रतिनिधी-सुनिल झिंजूर्डे पाटिल
गंगापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसल्याने यामध्ये तीन जंणाच्या विनंती तर सहाच्या प्रशासकीय आणि तीन आपसी अशा एकूण नऊ ग्रामसेवकाच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांच्या जागेवर इतर तालुक्यातील ग्रामसेवकांची बदली करत नेमणूक करण्यात आली, असून बदली करण्यात आलेल्या ठीकाणी ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक ग्रामपंचायतीत रुजू झाले आहे.
यामध्ये तालुक्यातून इतर तालुक्यात बदली करण्यात आलेले तसेच इतर तालुक्यातील गंगापूर तालुक्यात बदली करण्यात आलेले ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामसेवक यांचे नावे –
(कायगांव येथील ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुधाकर घुले यांची कन्नड तालुक्यातील कूंजखेडा येथे विनंती बदली त्यांच्या जागेवर खुलताबाद तालुक्यातील कसाबखेडा येथून कृष्णा गादु यांची नियुक्ती)
(लासुरस्टेशन देविदास ढेपले यांची विनंती मुख्यालय पंचायत विभाग औरंगाबाद त्यांच्या जागेवर सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथून डी. एन. मुकणे)
(जोगेश्वरी बि. एल. भालेराव आपसी बदली औरंगाबाद पंचायत समिती वडगाव कोल्हाटी त्यांच्या जागेवर जि. पी. धनवई)
(वाळूज एन. के. मतसागर यांची आपसी बदली पैठण तालुक्यातील चितेगांव ग्रामपंचायत येथे त्यांच्या जागेवर यु.सी भोंडवे )
(आसेगांव ग्रामपंचायत येथे भागीनाथ कटारे यांची औरंगाबाद पंचायत समिती अंतर्गत साजापुर येथून नियूक्ती)
तालुक्यातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सिरेसायगांव व्ही. यु. साळवे सिल्लोड तालुक्यातील म्हसला येथे विनंती बदली)
(येसगांव डीघी येथील रफीक शेख यांची औरंगाबाद पंचायत समिती अंतर्गत वडखा माहुली ग्रामपंचायत प्रशासकीय बदली त्यांच्या जागेवर कन्नड तालुक्यातील तांदुळवाडी ग्रा. प।मधून सारंगधर लोंढे यांची नियुक्ती)
(सिरसगांव व्ही. एम. म्हस्के वैजापूर तालुका माळी घोगरगांव प्रशासकीय)
(वरखेड संजय मनाळ वैजापूर तालुका जांबरगांव येथे त्यांच्या जागेवर येथूनच संदीपकुमार देशमुख यांची नियुक्ती)
(वसूसायगांव युवराज ढोकर कन्नड तालुका विटा येथे प्रशासकीय बदली त्यांच्या जागेवर पैठण खादगांव तांडा ग्रा. प. मधील शाम कसबे यांची नियुक्ती)
(एकलहेरा नांदेडा श्रीमती छाया जाधव पैठण तालुका गाढेगांव प्रशासकीय बदली त्यांच्या जागेवर फुलंब्री तालुक्यातील वावना ग्रा. प. येथून श्रीमती करुणा इंगोले यांची नियुक्ती )
(बाबरगांव संजय चोथे यांची पैठण तालुका बोकुडजळगांव प्रशासकीय बदली त्यांच्या जागेवर पैठण मधील नांदलगाव कौडगांव येथून श्रावण राठोड यांची नियुक्ती)
(पाचपीरवाडी श्रीमती छाया गव्हाणे यांची पैठण तालुका मावसगव्हाण प्रशासकीय बदली त्यांच्या जागेवर कन्नड तालुक्यातील भोकनगांव येथून श्रीमती रामेश्वरी सयाई यांची नियुक्ती)
(पखोरा श्रीमती मंगला तलमले यांची पैठण तालुका कृष्णापुर सोमपुरी आपसी बदली येथूनच बळीराम भिमगीर गीरी याची नियुक्ती)
(दिनवाडा ग्रामपंचायत रिक्त जागेवर सिल्लोड तालुक्यातील गेवराई शेमी येथून कारभारी गव्हाणे यांची नियूक्ती )
(झोडेगांव ग्रामपंचायतीत रिक्त जागेवर वैजापूर तालुक्यातील माळी घोगरगांव येथून श्रीमती ज्योती वाबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गंगापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमधे कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने इतर ग्रामसेवकाकडे तात्पुरता पदभार द्यावे लागत होते कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्यामुळे गावाचा विकास खुंटत होता परंतु आता शासनाने थोड्याफार प्रमाणात का होईना रिक्त जागेवर नियूक्ती केली खरी परंतु आजही अनेक ग्रामसेवकाकडे तालुक्यातील ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार असून अतिरिक्त जागेवर कायमस्वरूपी ग्रामसेवकांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहेत.