दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
- उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे या सध्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
त्यांनी तेर येथील गोरोबा काका मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंदीर प्रशासनाच्यावतीने त्यांच्या सत्कार करण्यात आला. यावेळी सुळे यांनी आठवणींना उजाळा दिला.
भाजपचे नेते डॉ. पदमसिंह पाटील व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे ऋणानुबंध हे गेली अनेक वर्षाचे आहेत. सुप्रिया सुळे यांनी डॉ. पदमसिंह पाटील यांच्या आठवणीना यावेळी उजाळा दिला.
शरद पवार यांच्या चांगल्या वाईट काळात डॉ. पदमसिंह पाटील यांनी पाठीशी उभे राहत साथ दिली. ‘डॉ. पाटील यांनी दिलेली साथ मी तरी आयुष्यभर विसरणार नाही,’ असे सांगत सुळे यांनी डॉ. पाटील यांच्या विषयी आदर व्यक्त केला.
तेर हे अजित पवार यांची सासुरवाडी असल्याने नाते घट्ट आहे. डॉ. पदमसिंह पाटील यांनी पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला आहे, त्यानंतर दोन्ही परिवारात कटुता आली होती. मात्र सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिल्याने त्यांची चर्चा होत आहे.