दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा–
सेलूतील राजमोहल्हा ही जुनी वस्ती परंतू येथे स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब असुन कचरा, शितपेयांच्या प्लॉस्टिकच्या बॉटल्या , कॅरी बॅग व दुधाच्या पिशव्यांनी नाल्या तुंबल्या आहेत. परिणामी नळाला पाणी सुटले की सर्व पाणी वाटेवर येत असुन पावसाळ्यात मुसळधार पाऊस आल्यावर जसे दृश्य दिसते तीच अवस्था झाली आहे.
नालींच्या स्वच्छतेकडे न माजी नगरसेवकांचे लक्ष ना भावी उमेदवारांचे. नगर परिषद प्रशासक व मुख्याधिकारी यांनी या बाबींकडे लक्ष देऊन पावसाळ्यापुर्वि नालींची स्वच्छता करुन घ्यावी अशी मागणी परिसरातील नागरीक करत आहेत.