दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- गोविंद पवार
लोहा न. पा. च्या प्रगणांत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्याचा ऐतिहासिक ठराव सर्वानुमते मंजूर केल्याबद्दल लोहा नगरीचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांचा पानभोसी येथे वीरशैव लिंगायत समाज बांधवांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
पानभोसी येथे दि. २९ हे २०२२ रोजी जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध गायक प्रा. प्रणव पडोळे (स्वामी) व सौ. शिवकांता पडोळे ( स्वामी) शिवभजन भक्ती संध्या कार्यक्रमाचे व नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनोहर भोसीकर होते तर स्वागताध्यक्षपदी राजेंद्र भोसीकर होते. उध्दाटक म्हणून उपसरपंच शिवकुमार भोसीकर हे होते
तसेच यावेळी कार्यक्रमाला माजी जि.प. सदस्य संजय भोसीकर, वैजेनाथ तोमसुरे,विठ्ठल ताकबिडे,शुभम भोसीकर, बाळकृष्ण फुके, गणेश नाईकवाडे, सुदर्शन भोसीकर, शिवा संघटनेचे उपजिल्हा अध्यक्ष गणेश घोडके मन्मथ नाईकवाडे यांच्या सहीत मोठ्या प्रमाणात वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते.
या वेळी लीगायत स्मशानभूमीसाठी बारा गुंठे जमीन दिल्याबद्दल पानभोसीचे रहीवासी सोमनाथदादा भोसकर व त्यांच्ये पुत्र प्रशांत भोसकर या पिता पुत्राचा ही पानभोसीयांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.