दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश नामदेव माने
राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जालना शहरातील अंबड चौफुली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री मा.श्री.अर्जुनराव खोतकर व शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.भास्करराव अंबेकर यांनी उपस्थित राहून राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले व रक्तदान उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपजिल्हाप्रमुख श्री.पंडीतराव भुतेकर, श्री.भागवत बावणे, श्री.शिवप्रसाद चितळकर, शहरसंघटक श्री.दीपक रणवरे यांच्यासह मोठ्या संख्येने उत्सव समितीचे पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती.