दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
कोल्हापूर जिल्ह्यांतील गडहिंग्लज तालुक्यांतील गासर्वे गावचे शहीद जवान प्रशांत शिवाजी जाधव यांच्यावर त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामांत सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यांत आले. लडाखमध्ये झालेल्या भारतीय लष्करांची बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यांतील सुपुंत्र प्रशांत जाधव यांना वीरमरण आले होते. अतिशय शोकाकूल वातावरणात प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासांठी जमलेल्या जनसागरांने पुष्पवृष्टी करीत जाधव यांच्या पार्थिंवाला अखेरची मानवंदना दिली. वीर पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम ठेवत जाधव कुटुंबीयांनी व गासर्वे ग्रामस्थांनी श्रद्धांजली वहिली. त्यामुळे एकीकडे विधवा प्रथा बंदीचा निर्णय गासवें ग्रामपंचायतीने घेतला वीर पत्नीला सन्मान देत कपाळावरील कुंकू कायम ठेवण्यांचा निर्धार करीत गावांतील वीर सुपुत्रांला अखेरचा निरोप दिला. आज पासून विधवा प्रथा बंदीचा कौतुकास्पद निर्णय घेतला. शहीद जवान यांच्या अंत्यसंस्कारांपासून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. त्यामुळे प्रशांतला खरी हीच श्रद्धांजली असणार आहे. आज सकाळी आठ वाजता विशेष विमानाने जवान प्रशांत जाधव यांचे पार्थिव बेळगांव विमानतळावर दाखल झाले तिथून हे पार्थिंव त्यांच्या मूळगावी नेण्यांत आले प्रशांत जाधव यांना अखेरचा निरोप देण्यासांठी सर्व पंचक्रोशीतील ग्रामस्थ माता बहिणी मित्र परिवार यांनी गर्दी केली होती दरम्यान त्यांचे पार्थिव प्रथम त्यांच्या घरी आणल्यानंतर पत्नी आणि आई वडिलांनी एकच आक्रोंश केला. यावेळी उपस्थितांना अश्रूं अनावर झाले. लडाख मधील या अपघातांने देशाचे कधीच भरुन न निघणारे नुकसान केले आहे मात्र या जवानांचे हे बलिदान देश कधीच विसरणारही नाही अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. शहीद प्रशांत जाधव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासांठी कोल्हापूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शहीद प्रशांत जाधव यांचे अंत्यदर्शन घेत पुष्पचक्र वाहिले.