
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी
बालाजी देशमुख
मागील ४० वर्षांपासून काँग्रेस पक्षात एकनिष्ठेने काम करणारे आणि बीड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष जिवंत ठेवणारे राजकिशोर मोदी हे काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार जोरदार चर्चा सर्वत्र रंगतांना दुसून येत होती. सामान्य कार्यकर्त्यांची देखील नाराजी उफाळून येत आहे. यासाठीच आज सर्व कार्यकत्यांनी काँग्रेस पक्षात होणारी घुसमट पाहून कार्यकर्त्यांची विचार मंथन बैठक आयोजित करण्यात आली होती. या विचार मंथनासाठी बीड, धारूर, केज तालुक्यातील काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या विचार मंथन बैठकीत साहित्यिक दिनकर जोशी यांनी स्वाभिमान जोपासण्यासाठी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्याच धर्तीवर आपला स्वाभिमान जोपासण्यासाठीच राजकिशोर मोदी यांनी देखील काँग्रेस सोडण्याचा निर्धार केला. ज्या पक्षात योग्य सन्मान नाही त्या ठिकाणी किती काळ थांबावे अशी भावना बोलून दाखविली.
केज