दैनिक चालू वार्ता रायगड म्हसळा प्रतिनिधी – प्रा अंगद कांबळे
दि.३० मे २०२२ रोजी एकता दिव्यांग कल्याणकारी संस्था श्रीवर्धन यांच्या प्रयात्नाने जिल्हा रुग्णालय अलिबाग व उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन आयोजित दिव्यांग व्यक्तिन्ना दिव्यांग प्रमाणपत्र करिता तपासणी शिबिर घेण्यात आले. त्या शिबिरात एकूण १२० हुन अधिक दिव्यांग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन रायगड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे हे लाभले. सदर शिबिर हे केंद्र शासनाच्या “दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान” अंतर्गत घेण्यात आले. या कार्यक्रमात श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. मधुकर ढवले यांचा सेवानिवृत्तीमुळे भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तालुका वैद्यकीय अधिक्षक डॉ. इंगोले-माणगाव, डॉ. संकपाल-पनवेल, डॉ. तांभाळे-पेन, डॉ.बंसोळे-कर्जत, डॉ. जगताप-महाड़, डॉ. पाटिल मॅडम-पोलादपुर, (RMO) निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गूंजकर-अलिबाग, ग्रामीण रुग्णालय कंशेळी डॉ.खंदाळे,पत्रकार समीर रिसवुड, ऍड. संतोष सापटे, संदीप लाड हे उपस्थित होते.
श्रीवर्धन तालुक्यातील दिव्यांग व्यक्तिना या दिव्यांग दाखल्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते. ही होणारी फरफड भयंकर त्रासदायक होती. तो त्रास कमी व्हावा यासाठी एकता दिव्यांग कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष निलेश नाक्ती यांनी वेळोवेळी जिल्हा शल्य चिकित्सकांना शिबिराकरिता निवेदन पत्र दिले होते. त्याचा त्यांनी सहानुभूति पूर्वक विचार करून श्रीवर्धनमध्ये शिबिर घेऊन दिव्यांगांना होणारा त्रास वाचविला. या शिबिरात १५०हुन अधिक दिव्यांगांची तपासणी केली असता एकूण १२० पात्र दिव्यांगांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी श्रीवर्धन रुग्णालयाचे कर्मचारी, जेष्ठ विधि स्वयंसेवक सुशील साईकर सर, कुणबी युवा संघटना यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमांती एकता दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष-निलेश नाक्ती, उपाध्यक्ष-मुईद सरखोत, सचिव-उदय माळी, सल्लागार-संतोष पारधी,सहसचिव-संतोष शेडगे, कार्याध्यक्ष-नवाब क़ुदरते, गोपीनाथ तुपे,विकास गायकर, किसन मेंदाडकर, कासार मॅडम यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून शिबिर संपन्न झाला.