दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी – गोविंद पवार
लोहा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत, सोनखेड येथे नुकतीच सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत शिवसेनाप्रणित शेतकरी विकास एकता पॅनलने 13 पैकी 13 जागा जिंकून दणदणीत विजय प्राप्त केला आहे.
सोनखेड ग्रामपंचायत ही लोहा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते. नुकतीच सोनखेड येथे सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक संपन्न झाली. या निवडणुकीत शिवसेनाप्रणित शेतकरी विकास एकता पॅनलचे 13, काँग्रेसप्रणित बळीराजा शेतकरी विकास पॅनलचे 13 आणि 2 अपक्ष असे एकूण 28 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीतील विजय हा आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जात होता. म्हणून ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती.
या निवडणुकीत शिवसेना प्रणित शेतकरी विकास एकता पॅनलने 13 पैकी 13 जागा जिंकून काँग्रेसप्रणित पॅनलचा दारुण पराभव केला. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा मिळवता नाही आणि तुरळक मतदारसंख्येत सुद्धा सर्वच्या सर्व विजयी उमेदवार हे शंभर मतांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
यामध्ये सर्वसाधारण मतदारसंघातून मोरे अशोक गोविंदराव, मोरे कृष्णा लक्ष्मणराव, मोरे दिगंबर विठ्ठलराव, मोरे देसाई शंकरराव, मोरे रामराव किशनराव, मोरे श्रीखंड गणपतराव, मोरे सुहास बालासाहेब आणि मोरे ज्ञानोबा भगवानराव असे 8, अनुसूचित जाती जमाती मधून खिल्लारे अशोक दिनाजी, इतर मागासवर्गीय मधून गौड अशोक बाबाराव, विमुक्त जाती भटक्या जमाती/ वि.मा.प्र. मधून ठाकुर सुरेशसिंह बहादुरसिंह असे 3 तर महिला राखीव मधून मोरे कमलबाई नामदेवराव आणि मोरे सिंधू माधवराव असे 2 अशा एकूण 13 उमेदवारांनी विजय संपादन केला आहे. शिवसेनाप्रणित पॅनल हे माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव विठ्ठलराव मोरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबुराव साहेबराव मोरे, सोनखेडचे लोकनियुक्त सरपंच श्री अच्युत शंकरराव मोरे, उपसरपंच प्रवीण आप्पाराव मोरे,पांडुरंग उत्तमराव मोरे (देशाई), माजी चेअरमन मोहनराव निवृत्तीराव मोरे, ज्ञानोबा मोरे गुरुजी, सुदामराव बाबाराव मोरे, शेख जिलानी, नंदकिशोर ज्ञानोबाराव मोरे गुरुजी, रहमान शेठ, गौस भाई तसेच सोनखेड ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आले होते. निवडणुकीतील विजयासाठी श्री नरसिंग श्रीपतराव मोरे, शंकरराव माधवराव मोरे, ज्ञानोबा नानासाहेब मोरे, परबतराव निवृत्तीराव मोरे, एकनाथ विठ्ठलराव मुकदम, साहेबराव गोविंदराव मोरे, दौलतराव माधवराव मोरे, मधुकरराव विठ्ठलराव मोरे, भगवान शिवराम वड, गणेशराव बावणे, सूर्यकांत मारोतराव मोरे, सुरेश उत्तमराव मोरे, किशन रावसाहेब मोरे, शंकर नामदेवराव मोरे, तुकाराम खिल्लारे, बाबुराव आहेरकर, विष्णुकांत मोरे मडकीकर, बापूराव मामा अटकोरे मडकीकर, विश्वनाथ पांडुरंगराव मोरे आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
विजयी मिरवणुकीच्या शेवटी सर्व विजयी उमेदवार तसेच पॅनलप्रमुखांनी सर्व मतदार बंधू भगिनींचे जाहीर आभार मानले…